Corona Virus : सिगारेट ओढणाऱ्यांना कोरोनाचा अधिक धोका? आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं काय? वाचा सविस्तर

Corona Virus update : सिगारेट ओढणाऱ्यांना आरोग्य तज्ज्ञांनी महत्वाचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला दिला आहे.
Corona
Corona Virus updatesaam tv
Published On

देशासहित जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा आजार दिवसेंदिवस लोकांमध्ये वेगाने पसरू लागलाय. त्यात कोरोनाच्या ४ नव्या व्हेरिएन्टने खळबळ माजवली आहे. याआधी आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. यामध्ये फुफ्फुसांचे आजार आणि श्वसन समस्यांचा समावेश होता. धुम्रपान करणाऱ्यांनाही या समस्या असतात. आता नव्याने कोरोना पसरू लागल्यानंतर आरोग्य तज्ज्ञांनी सिगारेट ओढणाऱ्यांनाही धोक्याचा इशारा दिला आहे.

सिगारेट ओढणाऱ्यांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावं लागतं. या लोकांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचाही सामना करावा लागतो. सिगारेटने होणाऱ्या नुकसानीविषयी माहिती असूनही काही लोक सिगारेट ओढतात. खरंतर कोरोना झाल्यानंतर सिगारेट ओढणे थांबवले पाहिजे. कोरोना झाल्यावर नेमकं काय करावं, याविषयी आरोग्य तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Corona
Pune : पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी महत्वाची अपडेट; माजी वैद्यकीय अधीक्षकाला पोलीस कोठडी, काही तरी मोठा उलगडा होणार?

सर्जन आणि पब्लिक हेल्थ एक्सपर्ट, एमडीएस आणि एमपीएच डॉक्टर अनुज कुमार यांनी म्हटलं की, 'एखाद्या सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला कोरोना झाल्यावर इतर इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. या व्यक्तींना कोरोनासहित इतर आजारही होऊ शकतात'.

काही जणांना सिगारेटचं व्यसन असतं. काही जण दिवसाला जवळपास दहा ते बारा सिगारेट ओढतात. सिगारेट ओढण्यामुळे त्यांचं फुफ्फुस आधीपासून कमकुवत असतं. सिगारेटचं व्यसन असणाऱ्यांना दिर्घकाळ कोरोनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. दिर्घकाळ कोरोनामुळे इम्यूनिटीवर परिणाम होतो. तसेच इतर आजार होण्याची जोखीम अधिक असते.

Corona
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

डॉक्टर अनुज यांनी काय सांगितलं?

डॉ. अनुज म्हणाले की, 'कोरोनानंतर अनेक गंभीर आजारांचा सामना होण्याची भीती वाढते. कोरोनानंतर हृदय, किडनी, मेंदू यावर परिणाम होतो. धूम्रपान करणाऱ्यांनाही या आजाराचा सामना करावा लागू शकतो. कोरोना झाल्यानंतर धोका अधिक वाढतो. कोरोना झाल्यानंतर शरीर इतर आजारांना आकर्षित करते.

Corona
Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा सुरु? युक्रेनकडून 40 रशियन विमानं नष्ट?

तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांनी सिगारेट आणि तंबाखू सारख्या अमली पदार्थापासून दूर राहिलं पाहिजे. अमली पदार्थापासून दूर न राहिल्यास शरीराची एकूण आरोग्य क्षमता कमकुवत होऊ शकते. तसेच यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com