Ukraine Russia War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा सुरु? युक्रेनकडून 40 रशियन विमानं नष्ट?

ukraine russia clash : युक्रेननं बलाढ्य रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय...यात रशियाची एअर बेसमध्ये उभी असलेली तब्बल ४० फायटर विमानं नष्ट केली आहेत...त्यामुळे पुन्हा युद्ध पेटण्याची शक्यता आहे...पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
ukraine russia
ukraine russia clashSaam tv
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

3 वर्षांनंतर पुन्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात होणार असल्याची परिस्थिती निर्माण झालीये त्याला कारण ठरलंय. युक्रेनचा ड्रोन स्ट्राईक. युक्रेननं रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय. या हल्ल्यात रशियाच्या सायबेरियातल्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलयं. युक्रेनवर हल्ला करणारी 40 बॉम्बर विमानं आता युक्रेनी ड्रोननं नष्ट केलीये. या विध्वंसक हल्ल्याची रशियन गव्हर्नरकडून पुष्टी केलीय. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात काय झाले? पाहूयात

युक्रेनचा रशियावर स्ट्राईक

युक्रेनने रशियन हद्दीतील Tu-95, Tu-2, A-50 या विमानांना केलं लक्ष्य़

रशियाच्या दुर्गम भागातील 'बेलाया' हवाई तळावर हल्ला

हल्ल्य़ात 40 हून अधिक बॉम्बर विमानं नष्ट

हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

'बेलाया' हवाई तळावर हल्ल्यामुळे आगडोंब

ओलेन्या एअरबेसच्या रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग

युक्रेनच्या हल्ल्यात रशियातील कोणत्या विमानांना लक्ष्य करण्यात आलं पाहूयात...

ukraine russia
FYJC Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत मोठी अपडेट; पहिल्या फेरीच्या नोंदणीची महत्वाची अडचणार दूर होणार

युक्रेनकडून रशियन विमानं नष्ट

1) Tu-95

1950 च्या दशकातील सर्वात जुने लढाऊ विमान

क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम

लांब पल्ल्यावरील शहरांना लक्ष्य करण्यास सक्षम

२) Tu-22

एक हाय-स्पीड लढाऊ विमान

क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम

3) A-50

दुर्मिळ आणि महागडे गुप्तचर लढाऊ विमान

दुर्मिळ गुप्तचर कारवायांसाठी उपयुक्त

ukraine russia
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

युक्रेननं रशियावर हल्ला केला कारण रशियाची ही विध्वसंक विमानं गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर वारंवार बॉम्बचा मारा करत होती. त्यामुळे रशियाची विध्वसंक शक्ती कमी करण्यासाठी युक्रेननं हा हल्ला केलाय.. मार्च 2025 मध्ये, युक्रेनने अमेरिकेच्या मध्यस्थीने 30 दिवसांच्या युद्धविराम प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र 31 मे रोजी रशियानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेननं रशियाला अद्दल घडवलीये. त्यामुळे हा ड्रोन हल्ला पुन्हा जगात युद्धाची सुरुवात करतो का असा प्रश्न उपस्थित करुन गेलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com