ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हृदय आपल्या शरीराचा महत्वाचा भाग आहे. यासाठी हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास हृदयाच्या आरोग्यासह ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहते.
ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे खराब कोलेस्ट्रोल कमी कऱण्यास मदत करतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पालक, मेथी सारख्या पालेभाज्यांमध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असताता. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
तुमच्या रोजच्या आहारात काजू, बदाम आणि पिस्ता सारख्या ड्राय फ्रुट्सचा समावेश करा.
याशिवाय, आहारात बेरीज, सफरचंद आणि केळी सारख्या फळांचा समावेश करा. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.