ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि शांत स्पॉट्स शोधताय तर पुण्याजवळीय या सुंदर ठिकाणांना भेट द्यायला विसरु नका.
पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळा- खंडाळा हे बेस्ट ठिकाणं आहे. सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला राजमाची किल्ला ते भुशी डॅम, टायगर लीपच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर माळशेज घाट आहे. तुम्ही येथे ढगांनी वेढलेले डोंगर आणि ओसंडून वाहणारा धबधब्याचे विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्हाला नैसर्गिक सुंदरताने नटलेल्या ठिकाणी शांत वेळ घालवायचा आहे तर ताम्हिणी घाटला नक्की भेट द्या.
पाचगणी आणि महाबळेश्वर ही हिल स्टेशनची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे वेण्णा लेक, विल्सन पॉईंट आणि स्ट्रॉबेरी फॉर्मला भेट देऊ शकता.
येथे बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले भगवान शंकराला समर्पित मंदिर आहे. तसेच तुम्ही येथे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य देखील भेट देऊ शकता.
पुण्यापासून २९० किलोमीटर अंतरावर सुंदर लपलेले ठिकाण म्हणजेच आंबोली धबधबा. पावसाळ्यात या धबधब्याला नक्की भेट द्या.