Pune : पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी महत्वाची अपडेट; माजी वैद्यकीय अधीक्षकाला पोलीस कोठडी, काही तरी मोठा उलगडा होणार?

Pune kidney scam : किडनी रॅकेट प्रकरणी महत्वाची अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात माजी वैद्यकीय अधीक्षकाची कोठडी ४ जूनपर्यंत केली आहे.
Pune kidney scam News
Pune kidney scam Saam tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याला पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर ससून रुग्णालयाचा माजी वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे याला ४ जूनपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांना किडनी रॅकेट प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Pune kidney scam News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती

किडनी रॅकेट प्रकरणात अजय तावरे याची सखोल चौकशी आणि तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली होती. या आधी 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा झालेल्या सुनावणीत आणखी दोन दिवस म्हणजे 4 जूनपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Pune kidney scam News
Ukraine Attack : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; ४० 'बाहुबली फायटर प्लेन' पाडले

काय आहे नेमके प्रकरण?

कोल्हापूरमधील एका महिलेला कथितपणे १५ लाख रुपयांचं आमिष दाखवण्यात आले होते. तिने एका प्रत्यारोपणाची गरज असलेल्या पुरुषाची पत्नी असल्याचे खोटे भासवले. त्यानंतर एका तरुण महिला रुग्णाला किडनी दान केली. त्याच्या बदल्यात त्या तरुण महिलेच्या आईनेही त्या पुरुषाला किडनी दान केली होती.

Pune kidney scam News
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट; ट्रायल झाली सुरु, प्रवास कधी करता येणार?

तावरे याची किडनी प्रत्यारोपणात मुख्य भूमिका आहे. तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट असल्याचे माहिती होते. तावरे यानेच त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. तावरेने किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. डॉ. तावरे हा रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्याने बनावट कागदपत्रांना मान्यता दिली असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता या प्रकरणात आणखी काय मोठा खुलासा होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com