Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट; ट्रायल झाली सुरु, प्रवास कधी करता येणार?

Bullet Train update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट हाती आलीये. ही बुलेट ट्रेन भारतात कधी येणार, याबाबतही महत्वाची माहिती हाती आली आहे.
Bullet Train
Bullet Train update saam tv
Published On

भारताची पहिली हाय-स्पीड ट्रेन सेवेच्या दिशेने सरकारने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई आणि अहमदाबाददरम्यान ५०८ किलोमीटर लांब असलेली हाय-स्पीड रेल्वे निर्माण करत आहे. या मार्गातील ३५२ किलोमीटर भाग गुजरातमधील ९ जिल्ह्यातून जात आहे. तर उर्वरित किलोमीटरचा भाग महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातून जात आहे.

भारतासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या बुलेट ट्रेनचं ट्रायल जपानमध्ये झालं आहे. जपानकडून ही ट्रेन भारताला २०२६ साली सुपुर्द केली जाणार आहे. ही ट्रेन ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणार आहे. बुलेट ट्रेन भारतात आणल्यानंतर या ट्रेनची देशातील भौगोलिक आणि हवामानानुसार चाचणी केली जाणार आहे. या ट्रेनने भारतीयांना २०२६ सालानंतरच प्रवास करता येईल.

जपानहून भारतात आणल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली बसवण्यात आलेली आहे. बुलेट ट्रेनच्या ट्रॅकची स्थिती, तापमान, सहनशीलता आणि धूळ प्रतिरोध याचीही माहिती नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर मेक इन इंडिया अंतर्गत पुढील पिढीच्या E10 सिरीज बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी केला जाणार आहे. तसेच जपान भारताला दोन शिंकान्सेन ट्रेन सेट देखील देणार आहे.

Bullet Train
Corona Update : हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने वसईतील तरुणाचा बळी घेतला, परिसरात हळहळ

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात एकूण १२ स्थानके असणार आहेत. ठाणे, विरार, बोईसर, वापी, सुरत आणि वडोदरा या स्थानकाचा समावेश आहे. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई-अहमदाबाद प्रवास फक्त २ तास ७ मिनिटांत होणार आहे. सध्या या प्रवासाला सुमारे ७ तास लागतात. या बुलेट-ट्रेनसाठी भारत आणि जपानचा २०१६ साली करार झाला. या प्रकल्पाचा ८० टक्के खर्च हा जपानकडून कमी व्याजदराच्या येन कर्जाद्वारे केला जाणार आहे .

Bullet Train
Yavatmal News : महाराष्ट्र पोलिसांचा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नेटवर्कला मोठा झटका; यवतमाळमध्ये केली जोरदार कारवाई, वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com