Corona Update : हसत्या खेळत्या कुटुंबाचा आनंद हिरावला; कोरोनाने वसईतील तरुणाचा बळी घेतला, परिसरात हळहळ

vasai Corona Update : कोरोनाने वसईत पहिला बळी घेतला आहे. यामुळे वसई-विरार शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.
vasai corona
vasai Saam tv
Published On

मनोज तांबे, साम टीव्ही

विरार : वसई-विरार शहरात कोरोनाच्या आजाराचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. मात्र यातील एका रुग्णाचा मुंबईच्या रहेजा रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडल. विनीत किणी असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर नायगावच्या पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

vasai corona
Yashwantrao Chavan Center State Awards : राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान

वसई-विरार शहरात गेल्या काही अनेक दिवसांपासून कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. मागील आठवड्यात वसईत एक करोना रुग्ण आढळळा होता. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालं होतं. नायगावच्या खोचिवडे गावात राहणार्‍या विनित किणी (४३) याला त्याला अचानक ताप आला. दरम्यान त्याला न्युमोनिया झाला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्याला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

vasai corona
Mumbai Shocking : मुंबईत २१ मजली इमारतीची कार लिफ्ट कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

रहेजा रुग्णालायत करण्यात आलेल्या चाचणीत त्याला कोरोनाचे निदान झाल्याचे आढळून आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेह घरी न नेता थेट पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार कऱण्यात आले.

विनित हा नायगावमधील असला तरी वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनियाचा झाला होता. त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले. आम्ही खबरदारी घेत असून नागरिकांनी करोनाच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करून घ्या, असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी केले आहे.

vasai corona
Maharashtra Politics : अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार का? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

खोचिवडे गावात घबराट

विनित किणी हा गेल्या काही दिवसांपासून सर्व सार्वजनिक कार्यक्रमात वावरत होता. त्यामुळे गावातील नागरिक आणि नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. पालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com