Maharashtra Politics : अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणार का? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit Pawar Alliance Saam Tv News
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे : ठाकरे बंधूनंतर अजितदादा आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास पुन्हा राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी मोठं भाष्य केलं आहे.

आमदार रोहित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर रोहित पवार म्हणाले,दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, जसा प्रश्न तुम्हाला पडला आहे. तसा अनेकांना पडला आहे. मात्र आजपर्यंत फक्त ही चर्चा आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व आमदारांना घेऊन शरद पवार, सुप्रिया सुळे,जयंत पाटील आम्हाला कुठेही काही सांगितले नाही, जर आम्हाला काही कळालं तर आम्ही म्हणजे समोरून नक्की येऊन सांगू. सगळ्यात जास्त मी सरकारवर टीका केली आहे'.

Sharad Pawar and Ajit Pawar
Jalinder supekar Transfer : वैष्णवी हगवणे प्रकरण भोवलं; विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची बदली

'शरद पवारसाहेब म्हणत असतील, यातील मला काही माहीत नाही, तर मी म्हणेन, मला यातील काही समजत नाही. सुप्रिया सुळे यावर जोपर्यंत बोलत नाही, तोपर्यंत काही होणार नाही. पवार साहेब यांच्या मनात काय आहे, हे कळत नाही. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बरीच काही चर्चा झाली. पुढच्या पिढीची जबाबदारी सुप्रिया ताई यांना दिली आहे. त्यामुळे सुप्रियाताई काय भूमिका घेत हे बघावे लागेल. राजकीय विषयावर ते बोलले असतील, तर वेगळेच काही होत असतं. पक्षाची जबाबदारी सुप्रिया ताई यांच्यावर आहे'.

Sharad Pawar and Ajit Pawar
Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी भाष्य केलं. 'मराठी अस्मिता टिकावी, यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पक्ष स्थापन केला. त्याला आपण शिवसेना म्हणतो. आता दोन शिवसेना आहेत. त्यातील एका शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. दुसऱ्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत. डीएनए एक आहे म्हटले जाते. मग प्रताप सरनाईक महापालिका निवडणुका येत आहेत म्हणून वेगळी भूमिका घेत आहेत. अमहाराष्ट्रीय मते मिळावी म्हणून प्रताप सरनाईक यांना पुढे केले जाते का असं म्हणायचं का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com