Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

Mumbai Deputy police Commissioners Transfers : मुंबई पलिसांत मोठे फेरबदल झाले आहेत. मुंबईतील १३ बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
Mumbai Police
Mumbai Deputy police Commissioners TransfersSaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई पोलीस वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील १३ पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखा ते अमली पदार्थ विरोधी पथकाच्या विभागाचा समावेश आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधी पोलिसांच्या बदल्या झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील १३ पोलीस उपाआयुक्तांच्या बदल्या झाल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या प्रकटीकरणाची जबाबदारी राज तिलक रोशन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर नवनाथ ढवळे यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड आता सायबर शाखेची धुरा सांभाळतील.

Mumbai Police
Vaishnavi Hagawane : वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले, हगवणे कुटुंबाचा गंभीर आरोप

कुणाची कुठे बदली?

दत्ता नलावडे हे पुन्हा परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त असणार आहेत. कृष्णकांत उपाध्याय यांच्यावर पुन्हा परिमंडळ ३ ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नवनाथ ढवळे यांची अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai Police
Husband Wife Quarrel : नवऱ्यावर बायको रुसली; थेट रस्त्यावर जाऊन बसली, पुण्यातील घटना, VIDEO

विजयकांत सागर यांच्यावर बंदर परिमंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राकेश ओला यांच्यावर परिमंडळ ७ तर समीर शेख यांच्यावर परिमंडळ ६ ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून पुन्हा एकदा राजतिलक रोशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai Police
Ladki Bahin Yojana : गलेलठ्ठ पगार, तरीही १५०० रुपयांचा मोह; तपासणीत पोलखोल, सरकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार? VIDEO

दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखेत तर पुरुषोत्तम कराड यांची सायबर डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन गुंजाळ यांची गुन्हे शाखा (प्रतिबंधतामक) येथे डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com