Siddhi Hande
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात शरद पवार हे नाव नेहमी आदराने घेतले जाते.
शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यांनी खूप कमी वयात राजकीय प्रवासात यश मिळवले.
शरद पवारांसोबतच पवार कुटुंबदेखील राजकारणात सक्रिय आहे.
शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार अशी संपूर्ण पुढची पिढी राजकारणात सक्रिय आहे.
शरद पवार हे मूळचे बारामतीचे आहे. बारामतीमधूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली.
शरद पवारांनी महाराष्ट्र एज्युकेशन स्कूल, बारामती येथून दहावी पास केली.
शरद पवारांनी बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली आहे.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटाचे अध्यक्ष आहे.