
जपानच्या जंगलात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ओफुनातो शहरातील इमारतीत आग पसरली आहे. त्यानंतर जंगालाला देखील आग लागली. जपानी मीडियानुसार, आगीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे ८० हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. हजारो लोकांनी घर सोडलं. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. जपानमधील आगीत १८०० हेक्टर (४४५० एकर) हून अधिक जमिनीवर आग पसरली आहे.
जपानच्या इतिहासातील सर्वात मोठी आग असल्याचं बोललं जात आहे. आग ही आधी ओफुनातो शहरात आग लागली. त्यानंतर जंगलात पसरली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक मृतदेह आढळला आहे. तसेच आगीमुळे ८० इमारती जळून खाक झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १९९२ वर्षानंतर जपानमध्ये सर्वात मोठी आग लागली आहे.
जपानमध्ये जंगलात लागलेल्या आगीवर तत्काळ नियंत्रण न मिळाल्याने भरभर सर्वत्र पसरली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरु केले आहेत. बदलत्या हवामानामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरची देखील मदत घेण्यात येत आहे. गेल्या वर्षांत १३०० जंगलांना आग लागल्याची घटना घडली.
जपानच्या जंगलात फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान आग लागण्याच्या घटना घडत असतात. या महिन्यात आतापर्यंत अनेकदा आग लागल्याची घटना घडली आहे. २०२३ मध्ये जपानमध्ये आतापर्यंत १३०० जंगलांना आग लागल्याची घटना घडल्या आहेत. १९७० नंतर आग लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.