japan Earthquake : जमीन थरथरली, वीज पुरवठा आणि बुलेट ट्रेन ठप्प; जपानमध्ये ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

japan earthquake News : जपानमध्ये भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी भूकंप झाल्याची घटना घडली आहे. जपानमधील इशिकावा येथे एका पाठोपाठ दोन भूकंप झाले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
जमीन थरथरली, वीज पुरवठा आणि बुलेट ट्रेन ठप्प; जपानमध्ये  ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
japan earthquake :Saam tv

नवी दिल्ली : भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जपानमधील जमीन थरथरली आहे. जपानमधील इशिकावा भागात भारतीय वेळनुसार सोमवारी सकाळी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल इतकी आहे. दोन मिनिटांच्या अंतराने दोन भूकंप झाले. या दोन भूकंपामुळे जपानी नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

जपानमधील भूकंपाने परिसरात एकच दहशत पसरली. लोक घर सोडून रस्त्यावर पळाले. या भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारती हलल्या. या घटनेचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. जपानमधील या भूकंपामुळे परिसरातील बत्ती गुल झाली आहे. या भूकंपामुळे झालेल्या जीवी

जमीन थरथरली, वीज पुरवठा आणि बुलेट ट्रेन ठप्प; जपानमध्ये  ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Meerut News: गंगा नदीत स्नान करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; हरिद्वारला जाणाऱ्या कारला अचानक आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

भूकंपामुळे बुलेट ट्रेन ठप्प झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. मात्र, सरकारने त्सुनामी येण्याचा अलर्ट दिलेला नाही. तरीही नागरिकांनी सतर्क राहावे, जपानमधील सरकारने म्हटलं आहे.

जपानी सरकारने नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. जपानमधील पूर्व भागातील बुलेट ट्रेन सेवा ठप्प झाली आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे.

जमीन थरथरली, वीज पुरवठा आणि बुलेट ट्रेन ठप्प; जपानमध्ये  ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Bomb Threat: चेन्नईहून निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

६ महिन्यांत तिसऱ्यांदा भूकंप

मीडिया रिपोर्टनुसार, जपानमधील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भूकंपाच्या तीव्र धक्क्याने बुलेट ट्रेनची सेवा ठप्प झाली. भूंकप आल्यानंतर तातडीने बुलेट ट्रेन सेवा थांबवण्यात आल्या. एप्रिल महिन्यात देखील जपानमध्ये ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. जानेवारी महिन्यातही भूकंप आला होता.

जानेवारी महिन्यात नोटो प्रायद्विप भागात ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. या भूकंपात २०० हून अधिक जणाचा मृत्यू झाला. या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या होत्या. त्यानंतर इमारतीत राहणाऱ्यांना घर रिकामे करण्यास सांगितले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com