Pune News: शिरुरमध्ये थरारक अपघात! चालकाचा ताबा सुटला; पोकलॅनसह ट्रेलर थेट दुकानात शिरला; VIDEO

Shirur Saradwadi Accident News: चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रेलर थेट सलूनच्या दुकानात शिरल्याची घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे
Pune News: शिरुरमध्ये थरारक अपघात! चालकाचा ताबा सुटला; पोकलॅनसह ट्रेलर थेट दुकानात शिरला; VIDEO
Shirur Saradwadi Accident News: Saamtv

शिरुर, ता. ३ जून २०२४

पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी (ता. शिरूर) येथे रात्री भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट रस्ता ओलांडून सलूनच्या दुकानांमध्ये घुसल्याची घटना घडली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी येथे रात्रीच्या वेळी पोकलेन घेऊन जाणारा ट्रेलर थेट सलूनच्या दुकानात घुसल्याची दुर्घटना घडली. पुण्याकडून अहमदनगरकडे जाताना ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून अपघातावेळी सलून व्यवसायिक हे आपले दुकान बंद करून घरी गेले होते, तसेच वर्दळीच्या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

या अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातामध्ये सलोन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आजूबाजूच्या लोकांच्या जीवितलाही धोका निर्माण झाला होता.

Pune News: शिरुरमध्ये थरारक अपघात! चालकाचा ताबा सुटला; पोकलॅनसह ट्रेलर थेट दुकानात शिरला; VIDEO
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

परंतु देव तारी त्याला कोण मारी या मराठी म्हणीप्रमाणे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला असून वाहन चालकाकडून नुकसान भरपाईसह कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भरधाव ट्रेलर थेट सलूनच्या दुकानामध्ये शिरल्याचे दिसत आहे.

Pune News: शिरुरमध्ये थरारक अपघात! चालकाचा ताबा सुटला; पोकलॅनसह ट्रेलर थेट दुकानात शिरला; VIDEO
Maharashtra Politics : एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com