Maharashtra Politics : एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास

Maharashtra Lok Sabha Election Prediction : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून एक्झिट पोलच्या आकडेवारीवर टीका करण्यात आली. ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास
Uddhav Thackeray On India Aghadi PMSaam TV
Published On

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सातही टप्पे पार पडले. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. मात्र, निवडणुकीच्या निकालाआधीच एक्झिट पोलने आकडेवारी सादर केली आहे. देशात पुन्हा एकदा भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज आकडेवारीत मांडण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून एक्झिट पोलच्या आकडेवारीवर टीका करण्यात आली आहे.

एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास
Nashik News: विखे पाटलांची एन्ट्री, शुभांगी पाटीलही बंडखोरीच्या तयारीत; नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रंगणार चढाओढ!

एक्झिट पोल म्हणजे गुवाहाटीत कापलेल्या रेडय़ांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय शंभर टक्के मुमकीन है! मोदी जात आहेत हाच 4 जूनचा खरा निकाल आहे, असा विश्वासही सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.

"4 जूनला मतमोजणी होईल व हुकूमशाहीचा अंधकार दूर होईल. मोदींनी ध्यान केले व सूर्याला शांत केले असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेच्या मनात उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाहीत व त्यामुळे भाजपचा पराभव होणारच आहे", असं सामना अग्रलेखात मांडण्यात आलं आहे.

"भाजप 225 जागांच्या पुढे जात नाही, इंडिया आघाडी 295 ते 310 जागा जिंकून सरकार स्थापन करेल. यावेळी एक्झिट पोलचे आकडे व 4 जूनचे प्रत्यक्ष निकाल यात जमीन अस्मानाचा फरक राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. एक्झिट पोलच्या माध्यमातून शेअर बाजारात उलथापालथ घडवायची व जाता जाता मोठा हात मारून जायचे", अशी टीकाही सामना अग्रलेखातून करण्यात आली.

"एक्झिट पोल हा सर्व आकडय़ांचा बनावट खेळ आहे. देशातल्या जनतेचा मूड आणि हे एक्झिट पोल अजिबात मेळ खात नाहीत. ज्या प्रकारचे आकडे समोर आणले तो सर्व सरकारी दबाव तंत्र व भाजपने फेकलेल्या पैशांचा खेळ आहे, पण पैशांच्या हव्यासापायी या ‘पोल’ कंपन्यांनी स्वतःचीच बेअब्रू करून घेतली", असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

एक्झिट पोल गुवाहाटीत कापलेल्या रेड्यांसारखा, ४ जूनला INDIA आघाडीच जिंकणार; ठाकरे गटाला विश्वास
Thane Lok Sabha Election: शिंदेच्या बालेकिल्लावर ठाकरे फडकावणार का झेंडा? राजन विचारे आणि नरेश म्हस्केंमध्ये कडवी टक्कर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com