Thane Lok Sabha Election: शिंदेच्या बालेकिल्लावर ठाकरे फडकावणार का झेंडा? राजन विचारे आणि नरेश म्हस्केंमध्ये कडवी टक्कर

Thane Election 2024 Result Battle: Rajan Vichare VS Naresh Mhaske: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची थेट लढत दोनवेळा खासदार राहिलेले राजन विचारे यांच्याशी आहे. या शिलेदार आणि निष्ठावंत अशा लढतीत कोण बाजी मारणार हे ४ जून रोजी समजणार आहे.
Thane Lok Sabha Election: शिंदेच्या बालेकिल्लावर ठाकरे फडकावणार का झेंडा? राजन विचारे आणि नरेश म्हस्केंमध्ये कडवी टक्कर
Rajan Vichare VS Naresh MhaskeSaam TV

लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिष्ठापणाला लागलीय. शिवसेनेत फूट पाडून भाजपसोबत साठगाठ बांधल्यानंतर शिंदे गट पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण टप्पे पार पडल्यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलने देशात एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. मात्र राज्यात १६ जागांवर लोकसभा लढवणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला मात्र ६ जागा मिळतील, म्हटलंय जातंय. या अंदाजामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढलीय.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शिंदेचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्ह्यातही सुरुंग लागण्याची शक्यता आहे. ठाण्यात अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नरेश म्हस्के ठाण्याचे महापौरसुद्धा होते. २०१२ पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेलेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर म्हस्के हे कायम त्यांच्यासोबत दिसत होते. दरम्यान म्हस्केंच्या विरोधात ठाकरे गटाने २ टर्म खासदार राहिलेल्या राजन विचारे यांना उमेदवारी दिलीय.

काय आहे स्थिती

ठाण्याच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच झाली होती, शेवटी भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढत म्हस्केंना उमेदवारी देण्यात आली. परंतु त्याच म्हस्केंचं भवितव्य धोक्यात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

नरेश म्हस्के यांची लढत ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्याशी आहे. या लढतीकडे शिलेदार विरुद्ध निष्ठावान, अशी म्हणून पाहिली जात आहे. दोनवेळा खासदार झालेल्या विचारे हे तिसऱ्यांदा दिल्ली गाठतील असा अंदाज आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाचे राजन विचारे हे नरेश म्हस्के यांना पराभूत करतील.

दरम्यान लोकसभेची उमेदवारी देताना महायुतीत वाद निर्माण झाला होता. भाजपच्या नेत्यांनी म्हस्केंच्या नावाला विरोध केला होता. भाजपकडून इच्छुक असलेले गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक हे म्हस्केच्या उमेदवारीवर नाराज होते. तसेच ठाण्याचे आमदार संजय केळकर देखील भाजपला उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज होते. म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले होते.

किती झालं मतदान

लोकसभेच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यात ठाण्यात मतदान प्रक्रिया पार पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघात मागील वेळी ५० टक्के मतदान झाले होते. यावेळी हा मतांचा टक्का दोन टक्क्यांनी वाढला. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघात ५२.०९ टक्के मतदानाची नोंद झालं.

अशी आहे लढत

विचारे आणि म्हस्के हे दोन्ही कट्टर शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे यांना मानणारे हो दोघेही शिवसैनिक. शिवसेनेत फुट पडली. विचारेंनी उद्धव ठाकरेंना साथ दिली तर नरेश म्हस्के यांनी शिंदें बरोबर राहणं पसंत केलं. शिंदेंनी बंड केलं त्यापासून ते मुख्यमंत्री शिंदेंसोबत दिसत आहेत. राजन विचारे आणि म्हस्केंच्या लढतीकडे शिलेदार आणि निष्ठावंत, असं पाहिलं जात आहे. निवडणुकीच्या प्रचारातही तेच चित्र दिसले. खरी शिवसेना कोणाची आणि खोटी शिवसेना कोणाची असाच रंग निवडणूक प्रचारात होता.

मागील लोकसभेतील इतिहास काय

२०१९ साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यावेळी राजन विचारे यांनी आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीत राजन विचारे यांना ४ लाख १२ हजार १४५ मते मिळाली होती. ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत.

Thane Lok Sabha Election: शिंदेच्या बालेकिल्लावर ठाकरे फडकावणार का झेंडा? राजन विचारे आणि नरेश म्हस्केंमध्ये कडवी टक्कर
kalyan Loksabha Election: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com