Kalyan Lok Sabha Constituency: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?

Maharashtra Election 2024 Result Update: Srikant Shinde VS Vaishali Darekar From Kalyan Constituency | शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या कल्याण मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचाच विजय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी मनसेनं सुद्धा प्रचार सभा घेतली होती.
Kalyan Lok Sabha Election 2024: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?
Srikant Shinde (Shinde Group) Vs Vaishali Darekar (Thackare Group)Saam TV

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडताच एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले गेले. लोकसभेच्या एक्झिट पोलने महायुतीची धकधक वाढलीय. लोकसभेचं बिगुल वाजलं होतं, त्यावेळी महायुतीच्या नेत्यांना आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास होता. मात्र हाती आलेल्या एक्झिट पोलने महायुतीची चिंता वाढवलीय.

हाती आलेल्या अंदाजानुसार राज्यातील जनतेला फोडाफोडीचं राजकारण आवडलं नसल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीला महायुतीच्या बरोबरीचे जागा मिळताना दिसत आहे. याच कारणामुळे कल्याण मतदारसंघाचं काय होईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. कारण कल्याणमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यातील जनतेला पक्ष फोडीचं राजकारण आवडलं नसेल तर श्रीकांत शिंदे यांना जनता काय आशीर्वाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडत भाजपसोबत साठगाठ बांधली होती. त्यामुळे कल्याणमधील जनता कोणाला कौल देईल हे पाहावं लागले. दरम्यान या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्या लढत पाहायला मिळाली.

किती झालं मतदान

कल्याण मतदारसंघात यंदा ५०.१२ टक्के मतदान झाल्याचं नोंद करण्यात आली आहे. कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं श्रीकांत शिंदे पुन्हा खासदारकी मिळवतील म्हटलं जात आहे. मात्र निवडणुकीच्या आधी झालेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाने विजय कठीण जाईल अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

काय आहे राजकीय स्थिती

या मतदारसंघाचा मागील इतिहास पाहता कल्याणच्या जागेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा लढवण्याची संधी मिळालीय. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की वैशाली दरेकरांना उमेदवारीचं तिकीट दिल्लीला पोहोचवणार हे पाहावं लागेल. मतदारसंघातील अपूर्ण कामे, महायुतीतील अंतर्गत वाद, कळवा-मुंब्रामधून होणारा विरोध, हे गोष्टी लक्षात घेतल्या तर ही निवडणूक श्रीकांत शिंदेंसाठी आव्हान ठरेल. परंतु टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार या जागेवरुन श्रीकांत शिंदे पुन्हा खासदारकी मिळवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण,मुंब्रा हे मतदारसंघ येतात. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे, एक आमदार शिवसेनेचा, एक आमदार मनसेचा आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षाचा निवडून आलाय.

कोणाचं आहे आव्हान

श्रीकांत शिंदेंच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महिला उमेदवाराला रिंगणात उतरवलं. ठाकरे गटाने कल्याण लोकसभेतून वैशाली दरेकर उमेदवारीचं तिकीट दिलं आहे. वैशाली दरेकरांनी २००९ मध्ये मनसेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या आनंद परांजपे यांनी पराभूत केलं होतं. दरेकर यांना १ लाख २ हजार ६३ मते मिळाली होती. तर आनंद परांजपेंनी २१२, ४७६ मतांसह विजय मिळवला होता.

२०१९ मध्ये परिस्थिती होती वेगळी

कल्याण लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदेंनी सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला होता. श्रीकांत शिंदेंनी ५,५९,७२३ मते मिळवून विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना २,१५,३८० मते मिळाली होती. यावेळी निवडणुकीच्या वेळी श्रीकांत शिंदेंना ६२.८७ टक्के मते मिळाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही श्रीकांत शिंदे यांना ४,४०,८९२ मते मिळाली होती.

Kalyan Lok Sabha Election 2024: जनता कोणाला देणार साथ? श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेत जाणार की, दरेकरांना मिळणार दिल्लीचं तिकीट?
Nashik Loksabha Election: नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे 'राज' करणार? का गोडसे साधणार विजयाची हॅट्रिक?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com