Eknath Shinde: श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

CM Eknath Shinde on Kalyan Lok Sabha Election 2024 : डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणमधून विजयाची हॅट्रिक करणार, त्याचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास
CM Eknath Shinde on Shrikant Shinde Kalyan Lok Sabha Election 2024Saam TV

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. यामध्ये मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, सर्वांचंच लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास
Breaking News: ईशान्य मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कल्याणमधून विजयाची हॅट्रिक करणार, त्याचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केलं असून मतदार त्यांना नक्कीच पसंती देणार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "श्रीकांत शिंदे यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. या मतदारसंघात त्यांनी चांगली विकासकामे केलेली आहेत".

"त्यामुळे मतदारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. मला असे वाटते, की श्रीकांत शिंदे विजयाची हॅट्रिक करतील. ते रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील. मी मतदारांना आवाहन करतो की, लोकशाहीच्या उत्सवात त्यांनी सहभागी होऊन भरभरून मतदान करावं"

"मतदान करणे आपला प्रत्येकाचा अधिकार आहे. आपलं एक मत देशाला बदलू शकतं, महाशक्तीकडे नेऊ शकतं. मी बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडून मतदान करत आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे", असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार, रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास
Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांनी मतदानापूर्वी EMV मशीनला घातला फुलांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com