Kalyan Lok Sabha Constituency: कार्यकर्ते चार्ज झालेत;'उबाठा'च्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उल्हासनगरमध्ये घेतली कार्यकर्त्यांची भेट

Thackray Group Candidate Vaishali Darekar: कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून उमेदवार वैशाली दरेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांनी उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेतली.
 Vaishali Darekar
Vaishali DarekarSaam Tv

अजय दुधाणे साम टीव्ही, उल्हासनगर

Maharashtra Politics Lok Sabha 2024

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार वैशाली दरेकर (Thackray Group Candidate Vaishali Darekar) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यानंतर त्यांनी उल्हासनगरमध्ये येऊन काँग्रेस कार्यालय मारळगाव तसेच वसेना मध्यवर्ती कार्यालय येथे भेट दिली. अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.  (Maharashtra Lok sabha Election)

उबाठाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या भेटीसाठी उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी बोलताना वैशाली दरेकर (Vaishali Darekar) म्हणाल्या की, कार्यकर्ते चार्ज झाले आहे. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, कीव येते ...करा ना जाहीर, करा ना जाहीर बोलत आज फडणवीसानी एकदाचं केलं जाहीर..हि नामुष्की असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये कल्याण लोकसभेची जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष (Kalyan Lok Sabha Constituency) होतं. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर (Kalyan Lok Sabha) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

श्रीकांत शिंदे कल्याणमधले महायुतीचे उमेदवार असणार आहेत. कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर (Lok Sabha 2024) आहेत. कल्याणमध्ये आतावैशाली दरेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिदे यांना टक्कर देणार आहेत.

 Vaishali Darekar
Maharashtra Politics: येत्या ८ दिवसात अनेक मोठ्या घडामोडी घडतील, शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; ठाकरे गटाचं वाढणार टेन्शन?

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. राज्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून कल्याणकडे पाहिले (Lok Sabha) जाते. श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत.तर वैशाली दरेकर 2009 मध्ये लोकसभेच्या रणांगणात उतरल्या होत्या.

 Vaishali Darekar
Maharashtra Politics 2024 : माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश; हेमंत गोडसेंच्या समर्थनात घोषणाबाजी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com