Chhatrapati Sambhajinagar: लोकसभा निकालाआधीच चंद्रकांत खैरेंकडून होमहवन; विजयासाठी यज्ञ सुरू, ८ तास करणार पूजा

Chandrakant Khaire Worship Before Lok Sabha Result: छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे लोकसभा निकालाआधी होमहवन करत आहे. विजयासाठी ते पूजा करत असल्याची माहिती मिळत आहे.
 चंद्रकांत खैरे पूजा करणार
Chandrakant Khaire WorshipSaam Tv

डॉ. माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा संदिपान भुमरे, इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरेंमध्ये तिरंगी लढत होत आहे. आता लोकसभा निवडणूकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याआधी आता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे होमहवन आणि पूजा करताना दिसत आहेत. विजयासाठी चंद्रकांत खैरे देवाला साकडं घालत असल्याचं दिसत आहे. महायुती अन् महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होताना दिसली आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar News) जिल्ह्यातील खुलताबाद येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरामध्ये चंद्रकांत खैरे पूजा करत आहेत. खैरे सलग ८ तास होमहवन आणि पूजा करत असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपला विजय व्हावा, यासाठी चंद्रकांत खैरे पूजा आणि होम हवन करत आहेत. सकाळी ११ ते १२ या मुहूर्तावर पूजेला सुरुवात झाली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा (Chandrakant Khaire) पराभव केला होता. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एमआयएमचा उमेदवार निवडून आलेला होता. आता पुन्हा एकदा खासदार इम्तियाज जलील हे रिंगणात आहेत. त्यामुळे आता या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काल एक्झिट पोलनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होण्याचे संकेत मिळत (Lok Sabha Election 2024) आहे.

 चंद्रकांत खैरे पूजा करणार
Lok Sabha exit poll LIVE : पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये एका जागेवर निकालाआधीच विजय; एक्झिट पोलनुसार INDIA आघाडीला मिळणार इतक्या जागा?

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला येणार आहे. तेव्हा चित्र स्पष्ट होईल. परंतु छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारतंय, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आता निकालाच्या अगोदर चंद्रकांत खैरे होमहवन करत (Lok Sabha Result) आहेत. तर पंतप्रधान मोदी ध्यानधारणेला बसलेले पाहायला मिळतंय. तर अनेक ठिकाणी निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागल्याने चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये अनेकवेळा आम्ही यज्ञाचं आयोजन केलं आहे. पक्षासाठी, उद्धव साहेबांसाठी आणि आमच्यावरचे संकट दूर होण्यासाठी आम्ही नेहमी विधिवत पूजा करत असल्याचंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे.

 चंद्रकांत खैरे पूजा करणार
Lok Sabha Exit Polls LIVE: नव्या संसदेत नवं सरकार कुणाचं? INDIA आघाडी की NDA? एक्झिट पोलची इंटरेस्टिंग आकडेवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com