Lok Sabha exit poll LIVE : पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये एका जागेवर निकालाआधीच विजय; एक्झिट पोलनुसार INDIA आघाडीला मिळणार इतक्या जागा?

Gujarat Loksabha Election Exit poll results LIVE : एनडीएला २६ पैकी २५ जागा मिळताना दिसतायेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. इंडिया आघाडीला १ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Lok Sabha exit poll LIVE
Lok Sabha exit poll LIVESaam Digital
Published On

गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून सुरतच्या जागेवर भाजपचा निकालाआधीच बिनविरोध विजय झाला आहे. त्यामुळे उर्वरित २५ जागांपैकी इंडिया आघाडीला १ जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमधून मांडण्यात आला आहे. तर एनडीएला २६ पैकी २५ जागा मिळताना दिसतायेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत एनडीएला ६३ टक्के मतदान मिळण्याचा अंदाजही मांडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं गुजरात हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. शनिवारी झालेल्या एक्झिट पोलसह भाजप गुजरातमध्ये हॅट्ट्रिकच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि राज्यातील सर्व 26 जागांवर पुन्हा एकदा विजय मिळवेल असाही अंदाज मांडण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपला राज्यातील २६ पैकी २६ जागा मिळतील.

राज्यातील सर्व २६ जागांसाठी ७ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान गुजरात हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गुजरातमध्ये 2019 सलग दुसऱ्यांदा सर्व 26 पैकी १६ जागा जिंकण्यात भाजपला यश आलं होतं. यावेळी भाजपने पाच विद्यमान खासदारांना घरी बसवलं होतं. याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र तरीही एक्झिट पोलमध्ये यावेळीही एखादा अपवाद वगळता सर्वच्या सर्व जागा जिंकताना दिसत आहे.

Lok Sabha exit poll LIVE
Exit poll results LIVE : बिहारमध्ये NDA ला नुकसान; INDIA आघाडीला किती मिळतायेत जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि राज्यातील इतर प्रादेशिक पक्षांसह विरोधी पक्षांना गुजरातमध्ये जागा परत मिळवण्यात अपयश आल्याचं दिसतं आहे. 2019 आणि 2014 च्या निवडणुकांमध्ये गुजरातमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी काँग्रेसने 23 जागांवर उमेदवार उभे केले होते, तर आप 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. समाजवादी पक्षही एका जागेवर निवडणूक लढत आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत, भारतीय जनता पक्षाने 156 जागा जिंकल्या - गुजरातच्या इतिहासातील कोणत्याही पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा होत्या. विधानसभेत काँग्रेसच्या गेल्या तीन दशकांतील सर्वात कमी जागा निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला आहे.

Lok Sabha exit poll LIVE
Exit poll results LIVE : बिहारमध्ये NDA ला नुकसान; INDIA आघाडीला किती मिळतायेत जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com