Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईकमुळे १२ वाहनं भस्मसात, परिसरात अक्षरश: कोळसा, रहिवाशांमध्ये संतापाची लाट

Ambernath Palegaon 11 Vehicles Fire : अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक गाडीला आग लागून बाजूला उभ्या असलेल्या १२ गाड्यांचाही कोळसा झाल्याची घटना घडलीये. त्यामुळं इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
Ambernath Palegaon Landscape Heritage Housing Complex Fire
Ambernath Palegaon Landscape Heritage Housing Complex FireSaamTV
Published On

ठाणे : अंबरनाथच्या पालेगाव परिसरात लँडस्केप हेरिटेज नावाचं गृहसंकुल आहे. या संकुलाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला काल बुधवारी रात्री आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या आगीने इलेक्ट्रिक गाडीत स्फोट होताच रौद्ररूप धारण केलं आणि आसपासच्या गाड्यांनाही आगीच्या वेढ्यात ओढलं.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ११ दुचाकी आणि एका कारचा अक्षरशः कोळसा झालाय. त्यामुळे रहिवाशांमध्ये उद्विग्नता आणि संतापाचं वातावरण आहे. आता इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूला कुणीही आपल्या गाड्या उभ्या करू नका, असं आवाहन सोसायटीतील रहिवाशांनी आसपासच्या इमारतीतील लोकांना केलंय. या घटनेमुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Ambernath Palegaon Landscape Heritage Housing Complex Fire
Uddhav Thackeray : मी 'धक्कापुरुष'! राजकीय धक्क्यांची तुलना उद्धव ठाकरेंनी जपानच्या भूकंपाशी केली, नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, काल कांदिवलीच्या दामू नगर झोपडपट्टीला आग लागल्याची दुर्घटना घडली होती. मुंबईत आगीचं सत्र काही थांबता थांबत नाहीय. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी या इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगारांना याची जाणीवच नव्हती.

मात्र, समोरच असलेल्या इमारतीमधील नागरिकांमुळे या कामगारांचे प्राण वाचले. नियमांची पायमल्ली करत बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप रहेजा विविएरा या इमारतीमधील रहिवाशांनी केला आहे.

Ambernath Palegaon Landscape Heritage Housing Complex Fire
IND vs BAN: रोहितचं नशिबच फुटकं! टॉस होताच भारतीय संघाच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com