
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेृतृत्व करताना दिसून येत आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची रोहित शर्माकडे होती.
या स्पर्धेत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले होते. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यादरम्यान भारतीय संघाने एकदाही नाणेफेक जिंकलं नव्हतं. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यातही नाणेफेक गमावून भारताने ही परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान नाणेफेक गमावताच रोहित शर्माच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे.
आयसीसी वनडे वर्ल्डकप झाल्यानंतर केएल राहुलनेही काही सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. कर्णधार बदलला, मात्र भारतीय संघाचं नशिब बदललं नाही. भारतीय संघाने आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये शेवटचा टॉस जिंकला होता.
त्यानंतर फायनलमध्ये भारताने टॉस गमावला.त्यानंतर भारतीय संघाला वनडे क्रिकेटमध्ये एकही टॉस जिंकता आलेला नाही. भारतीय संघाने सलग ११ सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे. आजवर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या कोणत्याच देशाने असा रेकॉर्ड केला नव्हता.
टॉस गमावला असला तरीदेखील भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे, भारताने टॉस गमावूनही बरेचशे सामने जिंकले आहेत. भारत आणि नेदरलँडने सर्वाधिक वेळेस टॉस गमावले आहेत.
नेदरलँड संघाबद्दल बोलायचं झालं, तर मार्च २०११ पासून ते ऑगस्ट २०१३ पर्यंत या संघाने सलग ११ सामन्यांमध्ये टॉस गमावला होता. तर भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर भारताने नोव्हेंबर २०२३ पासून ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत भारताने सलग ११ सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारताची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
बांगलादेशची प्लेईंग ११ -
नझमुल हुसेन शांतो(कर्णधार), तांझिद हसन, सौम्य सरकार, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झीम हसन, मुस्तफिजुर रहमान
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.