
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता.
संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी हर्षित राणाला संधी दिली गेली. दरम्यान बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळायला हवी याबाबत रिकी पाँटींगने मोठं वक्तव्य केलं आहे.
आयसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रिकी पाँटींग म्हणाला, ' मी नक्कीच डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची निवड करेल. बुमराहच्या जागी मी अर्शदीप सिंगला संधी देईल. सर्वांनाच माहीत आहे, तो टी-२० क्रिकेटमधील ग्रेट गोलंदाज आहे. त्याच्याकडे बुमराहप्रमाणे नवीन चेंडूने आणि शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करण्याचं कौशल्य आहे.'
तसेच तो पुढे म्हणाला की, ' याचा अर्थ असा मुळीच होत नाही, की हर्षितला डावललं जातंय. कारण तो देखील उत्कृष्ठ गोलंदाज आहे. तो नविन चेंडूने गोलंदाजी करताना काय करु शकतो हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. मात्र शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना तो कुठेतरी अर्शदीपपेक्षा मागे पडतो.'
भारतीय संघाला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची खूप गरज आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, ' डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज संघात असल्यामुळे वेगवान गोलंदाजीत आणखी आक्रमकता येते. एक असा गोलंदाज जो नव्या चेंडून स्विंग करु शकतो. सर्वांनाच माहीत आहे असा गोलंदाज संघात असणं किती गरजेचं आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या,हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.