
Champions Trophy Ind Vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीला काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर रविवारी २३ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची टक्कर होणार आहे. या सामन्यांची VIP हॉस्पिटॅलिटी बॉक्सच्या तिकीटांची पीसीबी अध्यक्षांनी विक्री केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची ३० तिकीटे देण्यात आली होती. ही ३० तिकीटे स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समधली असल्याचे म्हटले जात आहे. मोहसिन नक्वी यांनी ३० व्हीआयपी तिकीटांची विक्री करुन तब्बल ४,००,००० दिरहम म्हणजेच भारतीय चलनात ९४ लाख रुपये मिळवले आहेत.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी भारत वि. पाकिस्तान सामन्याची व्हीआयपी तिकीटे विकून मिळवलेले पैसे पीसीबीच्या तिजोरीत टाकल्याचे म्हटले जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नक्वी यांना व्हीआयपी बॉक्सऐवजी सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांसह बसून सामना पाहायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी तिकीटांची विक्री केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि पाकिस्तान रविवारी २३ फेब्रुवारीला एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पाकिस्तानने भारतावर पाच सामन्यांपैकी तीन वेळा पराभव केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.