ICC Champions Trohpy : चॅम्पियन्स ट्रॅाफीचा इतिहास काय? स्पर्धेला कधी सुरुवात झाली, आतापर्यंत कोण-कोणत्या संघानं भूषवलंय विजेतेपद? वाचा

ICC Champions Trohpy History: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला "मिनी वर्ल्ड कप" म्हणून संबोधले जाते. १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात केली.
Chamions Trophy
Chamions Trophy google
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॅाफी २०२५ स्पर्धेला फक्त एक दिवस बाकी आहे. १९ फेब्रुवारीला पहिला सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम कधी झाला, किती संघ होते, अंतिम फेरीत कोण पोहोचले, कोण विजेता झाला हे अनेकांना माहिती नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात केली. पहिला हंगाम शारजाह येथे खेळवण्यात आला. त्यात फक्त ३ संघ सहभागी झाले होते, भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज. ही स्पर्धा फक्त ३ संघांमध्ये खेळवण्यात आली. त्या स्पर्धेत भारताची स्थिती इतकी वाईट होती तो अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही.

अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा ११ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडिजने ही स्पर्धा जिंकली आणि त्यांना ३०,००० अमेरिकन डॉलर्स बक्षीस रक्कम मिळाली. तर, उपविजेत्या पाकिस्तानला २०,००० डॉलर्स आणि भारताला १५,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच आताचे ८ लाख रुपये मिळाले.स्पर्धेत एकूण ६ सामने खेळवण्यात आले. सर्व संघांनी २-२ सामने खेळले. भारताने २ पैकी फक्त १ सामना जिंकला होता. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ज्याला "मिनी वर्ल्ड कप" म्हणून संबोधले जाते. १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सुरू केली. या स्पर्धेला सुरुवातीला आयसीसी नॉकआउट टूर्नामेंट असे नाव देण्यात आले होते. ही दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. याचे मुख्य उद्दिष्ट कसोटी खेळणाऱ्या नसलेल्या देशांमध्ये क्रिकेटसाठी निधी जमा करणे होते.

Chamions Trophy
Champions Trophy: ना रोहित, ना विराट.. हा एकटा खेळाडू टीम इंडियाला चॅम्पियन बनवणार

चॅम्पियन्स ट्रॉफी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित केली जाणारी एक प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आहे , ज्यामध्ये जगातील अव्वल संघ जेतेपदासाठी स्पर्धा करतात. २००९ च्या हंगामापासून, चॅम्पियन्स ट्रॅाफीसाठी केवळ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत फक्त पहिल्या आठ संघांचा समावेश करण्यात यावा अशी सुधारणा करण्यात आली. स्पर्धेच्या सहा महिने आधी रँकिंग कटऑफ निश्चित करण्यात आला.

१९९८ ते २०२५ पर्यंतच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांची यादी

वर्ष विजेता

१९९८ दक्षिण आफ्रिका

२००० न्यूझीलंड

२००२ श्रीलंका आणि भारत

२००४ वेस्ट इंडीज

२००६ ऑस्ट्रेलिया

२००९ ऑस्ट्रेलिया

२०१३ भारत

२०१७ पाकिस्तान

Chamions Trophy
Heart Attack: जास्त तणावामुळे वाढतं हार्ट अटॅक येण्याची शक्यता, अशी घ्या काळजी

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com