Heart Attack: जास्त तणावामुळे वाढतं हार्ट अटॅक येण्याची शक्यता, अशी घ्या काळजी

Stress Causes Heart Attack: काम आणि जीवनशैलीमुळे ताणतणाव हा आपल्या आयुष्याचा भाग बनला आहे. दररोज आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीने तणावात असतो, परंतु दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने हृदयावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का. जाणून घ्या.
Heart Attack
Heart Attackyandex
Published On

बदलती जावनशैली, काम यामुळे ताणतणाव आपल्या जीनवाचा भाग बनला आहे. आपण दररोज कोणत्या न कोणत्या गोष्टीने तणावात राहतो. ही एक शारीरिक आणि मानसिक प्रतिक्रिया आहे. जेव्हा आयुष्यात आपण आव्हान किंवा धोक्याचा सामना करतो तेव्हा आपण तणावात जातो. हा ताण हळूहळू आपल्या हृदयाला हानी पोहोचवू लागतो आणि दीर्घकाळापर्यंत तणावामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. रोजचा ताण कशाप्रकारे आपल्या हृदयासाठी हानिकारक असू शकतो आणि याची काळजी कशी घ्याल जाणून घ्या.

दीर्घकाळापर्यंत तणावात राहणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

जास्त वेळ तणावात राहिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हा ताण आपल्या हदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले शरीर अॅड्रेनालाइन आणि कोर्टिसोल नावाचे हार्मोन रिलीज करते. या हार्मोन्सचा परिणाम आपल्या हार्ट वर होऊन हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर वाढते. तसचे रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.

तणावामुळे हृदयविकाराचा झटका कसा येतो?

तणावामुळे अनेक प्रकारे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तणाव सर्वप्रथम, रक्तदाब आणि हृदय गती वाढवते, ज्यामुळे हृदयावर अधिक दबाव येतो. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात. आणि हदयाला रक्तप्रवाह कमी होऊ लागतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढू शकते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. तणावामुळे जीवनशैली बिघडू लागते. तसेच यामुळे धुम्रपान, अल्कोहोल पिणे आणि अनहेल्दी अन्न खाणे यासारख्या गोष्टी वाढतात. हे सर्व घटक हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.

Heart Attack
Kidney Stone: शरीरात 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; असू शकतं किडनी स्टोन,अशी घ्या काळजी

तणावाची लक्षणे कोणती?

तणाव दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे अक्युट स्ट्रेस आणि एक क्रोनिक स्ट्रेस. अक्युट स्ट्रेस हा कमी कालावधीसाठी असतो. आणि काही कारणामुंळे हा ताण जाणवतो आणि कमी होतो. परंतु क्रोनिक स्ट्रेस हा अधिक काळापर्यंत राहतो. सततच्या आव्हानांमुळे हा ताण जाणवतो. तणावाची काही मुख्य लक्षणे असतात. जसे की, अँक्झायटी, चिडचिड, राग, थकवा, डोकेदुखी, नैराश्य, उदास राहणे आणि पोट खराब राहणे.

तणावापासून अशी घ्या काळजी

तणावापासून काळजी घेण्यासाठी काही गोष्टींचा रोजच्या जीवनात अवलंब करा. नियमित व्यायाम करा, हेल्दी लाइफस्टाइलचा अवलंब करा, हेल्दी जेवण खा, सोशल अॅक्टीव्हिटीमध्ये भाग घ्या, आराम करा आणि पूर्ण झोप घ्या. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तणावाचा अधिक त्रास होत असेल तर डॅाक्टरांचा सल्ला घ्या.आणि तपासणी करुन घ्या.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Heart Attack
Parenting Tips: पालकांनो, मुलांच्या बोर्ड परीक्षेसाठी फॅालो करा 'या' टिप्स, मुलं परिक्षेत करतील टॅाप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com