Champions Trophy: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव! टीम इंडियाची नवी जर्सी पाहिली का?

Team India New Jersey For Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने नवी जर्सी लाँच केली आहे. दरम्यान भारतीय संघाची नवी जर्सी पाहिली का?
Champions Trophy: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव! टीम इंडियाची नवी जर्सी पाहिली का?
team indiatwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ दुबईत दाखल झाला असून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान सोमवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघाची जर्सी लाँच करण्यात आली.

भारतीय खेळाडूंनी नव्या जर्सीमध्ये फोटोशूट केलं. ज्यात रविंद्र जडेजा , हार्दिक पंड्या, विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा पोझ देताना दिसून आले. बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव

Champions Trophy: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव! टीम इंडियाची नवी जर्सी पाहिली का?
Champions Trophy: ना रोहित, ना विराट.. हा एकटा खेळाडू टीम इंडियाला चॅम्पियन बनवणार

आयसीसीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीय खेळाडूंचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्या खेळाडूंना आयसीसीकडून पुरस्कार मिळाले आहेत, अशा खेळाडूंना आयसीसीकडून कॅप देण्यात आली. यावेळी भारतीय खेळाडू भारतीय संघाच्या नव्या जर्सीत दिसून आले.

या जर्सीवर पाकिस्तानचं नाव असल्याचं दिसून येत आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र बीसीसीआय भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहून घेणार नाही, असं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर बीसीसीआयकडून स्पष्टीकरण आलं होतं की, बीसीसीआय आयसीसीच्या सर्व नियमांचे पालन करेल.

Champions Trophy: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव! टीम इंडियाची नवी जर्सी पाहिली का?
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

पहिल्यांदाच भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यात आलं आहे. यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं. यापूर्वी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. इतर सर्व संघाच्या जर्सीवर यजमान पाकिस्तानचे नाव होते. मात्र भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापण्यात आलं नव्हतं. त्यावेळीही स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र भारतीय संघाचे सामने हायब्रीड मॉडेलमध्ये श्रीलंकेत खेळवले गेले होते.

भारतीय संघाचे सामने कधी?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासुन सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर २३ फेब्रुवारीला भारत- पाकिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर २ मार्चला भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com