
Champions Trophy Ind Vs Ban : दुबईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या सामन्याचा टॉस बांगलादेशच्या कर्णधाराने जिंकला आहे. नझमुल हुसेन शांतोने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
टॉसच्या वेळी कर्णधार रोहीत शर्माने प्लेईंग ११ ची घोषणा केली. संघात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा असे ३ फिरकीपटू आहेत. अर्शदीप सिंहच्या ऐवजी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. राणाच्या सोबतीला मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या असणार आहेत. सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे म्हटले जात आहे.
काल चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तानचा न्यूझीलंडच्या संघाने जोरदार पराभव केला. आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना भारत आणि बांगलादेश या दोन संघात खेळला जाणार आहे. विजयी सुरुवात करण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
भारताची प्लेईंग ११ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
बांगलादेशची प्लेईंग ११ -
नझमुल हुसेन शांतो(कर्णधार), तांझिद हसन, सौम्य सरकार, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झीम हसन, मुस्तफिजुर रहमान
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.