IND vs BAN Live Updates : नंबर वन बॅट्सनची नंबर 1 कामगिरी, भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

India vs Bangladesh Match ICC Champions Trophy 2025 Live Updates : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना होणार आहे. भारतीय टीम विजयी सुरूवात करेल.
India vs Bangladesh Match ICC Champions Trophy 2025 Live Updates
India vs Bangladesh Match ICC Champions Trophy 2025 Live Updates
Published On

नंबर वन बॅट्सनची नंबर 1 कामगिरी, भारताचा बांगलादेशवर दमदार विजय

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला आहे. या विजयात उपकर्णधार शुबमन गिलचे महत्त्वाचे योगदान आहे.

'प्रिन्स'ची शतकीय खेळी, दुबईत शुबमन गिलची कमाल

शुबमन गिलने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताच्या पहिल्याच सामन्यात शतक ठोकले आहे. त्याने १२८ चेंडूमध्ये १०० धावा केल्या आहे. त्याच्या शतकामुळे भारताचा विजय निश्चित झाला आहे.

भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल...

भारताला जिंकण्यासाठी अवघ्या २० धावांची गरज आहे.

गिल- राहुलची अर्धशतकी भागीदारी! टीम इंडियाची विजयाच्या दिशेने वाटचाल

गिल आणि राहुलने मिळून शानदार अर्धशतकी भागीदारी केली आहे. यासह भारताने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

भारताचं टेन्शन वाढलं! ४ फलंदाज तंबूत

भारतीय संघाला चौथा धक्का बसला आहे. अक्षर पटेलही स्वस्तात माघारी परतला आहे.

भारताला चौथा धक्का! श्रेयस अय्यर तंबूत

श्रेयस अय्यर स्वस्तात बाद होऊन माघारी परतला आहे.

उपकर्णधार ऑन ड्यूटी! शुबमन गिलचं अर्धशतक पूर्ण

गिलने ७१ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

भारताला दुसरा मोठा धक्का! विराट पुन्हा एकदा फ्लॉप

भारताला दुसरा मोठा धक्का! विराट पुन्हा एकदा फ्लॉप..विराट कोहली अवघ्या २२ धावांवर तंबूत परतला आहे.

विराट- गिलची जोडी जमली! भारताचं शतक पूर्ण

गिल आणि विराटच्या शानदार फलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने १०० धावांचा पल्ला गाठला आहे.

भारताला पहिला मोठा धक्का! रोहित इतक्या धावांवर तंबूत परतला

भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा ४१ धावांवर माघारी परतला.

रोहित- गिलची दमदार सुरुवात! भारतासमोर २२९ धावांचं आव्हान

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावांची गरज आहे. या धावांचा पाठलाग करताना रोहित आणि गिलने दमदार सुरुवात केली आहे.

तौहिद हृदोयचं शतक पूर्ण! शमीने 'पंजा' खोलला

तौहिद हृदोयचंने बांगलादेशकडून शानदार शतकी खेळी केली. तर मोहम्मद शमीने ५ गडी बाद केले.

बांगलादेशला सहावा धक्का! मोहम्मद शमीने रचला इतिहास

मोहम्मद शमीने बांगलादेशला सहावा धक्का दिला आहे. यासह शमीने २०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

जाकीर अली - हृदोयची अर्धशतकं! बांगलादेशची धावसंख्या १५० पार

बांगलादेशकडून जाकीर आणि तौहिद हृदोयने शानदार अर्धशतकं झळकावली आहेत.

जाकीर अली - हृदोयची अर्धशतकं! बांगलादेशची धावसंख्या १५० पार

बांगलादेशची धावसंख्या १०० पार..

बांगलादेशची धावसंख्या १०० पार जाऊन पोहोचली आहे. बांगलादेशची जोडी चांगलीच जमली आहे.

IND vs BAN Live Updates : अक्षरची हॅटट्रिक हुकली, रोहितने कॅच सोडला

आठव्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवर अक्षर पटेल हॅटट्रिक घेण्याच्या तयारीत होता. मात्र रोहित शर्माने स्लिपमध्ये झाकीर अलीचा झेल सोडला. यामुळे अक्षरची हॅट्टिक हुकली.

IND vs BAN Live Updates : अक्षर पटेलचा बांगलादेशाला सलग दुसरा धक्का

बांगलादेशाने ५ विकेट्स गमावल्या आहेत. अक्षर पटेलने गोलंदाजीला येताच दोन विकेट्स घेतलेत.

IND vs BAN Live Updates : बांगलादेशाची तिसरी विकेट

भारताने तिसरी विकेट मिळवली आहे. मोहम्मद शमीने मिराजला पॅव्हेलियनमध्ये पाठवलंय. सातव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर मिराज स्लिपमध्ये कॅच आऊट झाला.

IND vs BAN Live Updates : सामन्याच्या १० मिनिटांत बांगलादेशाचे दोन खेळाडू तंबूत

बांगलादेशाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद शमीने तर दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने एक-एक विकेट मिळवली आहे.

IND vs BAN Live Updates : भारताची प्लेईंग ११

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के.एल. राहुल, हार्दिक पंड्या. रविंद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

IND vs BAN Live Updates : विराटच्या निशाण्यावर सचिनचा विक्रम

टीम इंडिया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. विराट सध्या त्याच्या फॉर्मशी झुंजतोय. या सामन्यात विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधी आहे. जर किंग कोहलीने ३७ धावा केल्या तर तो वनडे सामन्यात १४,००० रन्स पूर्ण करणार आहे. असे करणारा जगातील सर्वात जलद फलंदाज बनेल. यामध्ये तो सचिन तेंडुलकरला मागे टाकणार आहे.

IND vs BAN Live Updates : बांगलादेशाने जिंकला टॉस

बांगलादेशाचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने टॉस जिंकला आहे. यावेळी बांगलादेशाने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

IND vs BAN Live Updates : दुबईची खेळपट्टी कशी असणार आहे?

दुबईची खेळपट्टी सहसा फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरू शकते. परंतु यावेळी खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरेल असं पिच क्युरेटरचे म्हणणं आहे. संध्याकाळ होताच दव मोठी भूमिका बजावू शकते.

IND vs BAN Live Updates : टीम इंडियाचा रेकॉर्ड

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारताने दुबईमध्ये एकूण ६ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना एकही सामना हरलेला नाही. यामध्ये पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला असून एक सामना बरोबरीत सुटला. हे सर्व सामने २०१८ च्या आशिया कपमध्ये खेळले गेले होते.

IND vs BAN Live Updates : सामना किती वाजता होणार सुरु?

भारत विरुद्ध बांगलादेश सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस अर्धा तास आधी होईल.

IND vs BAN Live Updates : इंडिया वर्सेस बांग्लादेश हेड टू हेड

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 41 वनडे सामने खेळले गेलेत. ज्यामध्ये टीम इंडियाने 32 सामने जिंकून आपला दबदबा कायम ठेवला आहे.

IND vs BAN Live Updates :  हर्षित राणा बेंचवरच

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी याच्या खांद्यावर आहे. त्याच्या जोडीला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संघात स्थान मिळू शकते. हार्दिक पांड्या, शमी आणि अर्शदीप हे भारताचे तीन वेगवान गोंलदाज असतील. त्यामुळे हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती यांना बेंचवरच बसावे लागेल.

IND vs BAN Live Updates :  बांगलादेशची संभाव्य प्लेईंग ११ 

तंजीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह, जेकर अली/तौहीद हृदोय, नसुम अहमद, तस्कीन अहमद, नाहिद राणा, तंजीम साकिब/मुस्तफिजुर रहमान.

IND vs BAN Live Updates : फिरकी गोलंदाजीत कोण कोण?

वरूण चक्रवर्ती आणि वॉशिंगटन सुंदर यांना बेंचवरच बसावे लागेल. कारण रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांचे स्थान निश्चित मानले जातेय. तर अनुभवामुळे कुलदीप याला संघात स्थान मिळण्याची शक्यात आहे.

IND vs BAN Live Updates :  विकेटकीपर कोण?

केएल राहुल की ऋषभ पंत, विकेटकीपर म्हणून टीम इंडिया कुणाला उतरवणार याची चर्चा सुरू आहे. केएल राहुल यालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतला बेंचवरच बसावे लागेल.

India vs Bangladesh Live Updates : प्लेईंग ११ मध्ये कोण कोण?

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी

India vs Bangladesh Live Updates : विजयी सुरूवात कऱण्यासाठी मैदानात उतरणार

रोहित शर्मा अॅण्ड कंपनी चॅम्पियन्स ट्रॉफीची विजयी सुरूवात कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांचा सामना आज बांगलादेशविरोधात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com