IND VS PAK : भारताविरोधात भिडण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का, हुकमी एक्का स्पर्धेबाहेर

India vs Pakistan Match : पाकिस्तानचा सलामी फलंदाज फखर जमा दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेला. न्यूझीलंडविरोधात झालेल्या सलामीच्या सामन्यावेळी फखर दुखापतग्रस्त जाला होता.
Ind Vs Pak champions trophy 2025
IND VS PAK : भारताविरोधात भिडण्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का, हुकमी एक्का स्पर्धेबाहेर Saam Tv
Published On

fakhar zaman out of india vs pakistan match भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २३ फेब्रुवारी रोजी अटीतटीचा सामना होणार आहे. पण त्याआधीच पाकिस्तानला तगडा झटका बसला आहे. अनुभवी सलामी फलंदाज फखर जमान याला गंभीर दुखापत झाली आहे. न्यूझीलंडविरोधातील पहिल्याच सामन्यात फखर दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे उर्वरित चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याला मुकावे लागणार आहे. पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यात अनुभवी फलंदाज स्पर्धेबाहेर गेल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. (Ind Vs Pak champions trophy 2025)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यात आता विस्फोटक सलामी फलंदाज फखर जमान दुखापतग्रस्त झाल्यामुळे स्पर्धेबाहेर गेलाय. न्यूझीलंडविरोधातील सामन्यावेळी फिल्डिंग करताना फखर दुखापतग्रस्त झाला होता. त्याला फलंदाजीलाही सलामीला उतरता आले नाही, आता स्पर्धेबाहेर गेला आहे. फखर स्पर्धेबाहेर गेल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या. अनुभवी फखर जमान याने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धावांचा डोंगर उभारला होता, भारताविरोधातही त्याने खोऱ्याने धावा चोपल्या होत्या.

पाकिस्तानला तगडा झटका

फखर जमान याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दुखापत झाली. न्यूझीलंडविरोधात फिल्डिंग करताना दुखापत झाली. चेंडूचा पाठलाग करताना फखर याच्या पायाला दुखपत झाली.त्यामुळे त्याला फील्डिंगही करता आली नाही. तो फलंदाजीसाठी चौथ्या क्रमांकावर अतरला. पण फलंदाजी करतानाही त्याला त्रास होत असल्याचे दिसत होता.

Ind Vs Pak champions trophy 2025
IND vs BAN : हर्षित राणा बाहेरच, ३ स्पिनरसोबत उतरणार टीम इंडिया, पाहा प्लेईंग ११

पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाणार ?

अनुभवी आणि विस्फोटक फखर स्पर्धेबाहेर गेल्यामुळे पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट ओढावले आहे. पाकिस्तानचा आधीच एका सामन्यात पराभव झालाय. सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवावाच लागेल, पण आता अनुभवी फलंदाज नसल्यामुळे दबाव आणखी वाढला असेल. त्यात भारतविरोधात खेळताना पाकिस्तान नेहमीच नांगी टाकतो. त्यामुळे यजमान पाकिस्तान स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com