IND vs BAN : हर्षित राणा बाहेरच, ३ स्पिनरसोबत उतरणार टीम इंडिया, पाहा प्लेईंग ११

Team India Predicted Playing XI vs Bangladesh : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया आज बांगलादेशविरोधात मैदानात उतरणार आहे. दुबईच्या मैदानात भारतीय संघ कोणत्या प्लेईंग ११ सोबत उतरणार याची चर्चा सुरू आहे.
Team India Predicted Playing XI vs Bangladesh
Team India Predicted Playing XI vs Bangladesh
Published On

India Predicted Playing XI vs Bangladesh : रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अभियानाची सुरूवात करणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात होणार आहे. बांगलादेशविरोधा टीम इंडिया कोणत्या ११ शिलेदारांना मैदानात उतरणर? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भारत किती फिरक गोलंदाजासह मैदानात उतरणार, वेगवान गोंलदाज कोण असतील? याबाबत संभ्रम आहे. पाहूयात बांगलादेशविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग ११

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या १५ जणांच्या चमूमध्ये पाच फिरकी गोलंदाज आहेत. तर मोहम्मद शामी वेगवान गोंलदाजीचे आक्रमण सांभाळणार आहे. पाच फिरकी गोलंदाजापैकी कुणाला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळणार? कुणाला बेंचवरच बसावे लागणार? हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होणार आहे. आज दुपारी दोन वाजता बांगलादेशविरोधात नाणेफेक होईल, त्यानंतर भारत्या प्लेईंग ११ वरून पडदा उठणार आहे.

Team India Predicted Playing XI vs Bangladesh
IND vs PAK : आता भारताला दुबईत हरवा, शाहीद आफ्रिदी पुन्हा बरळला

केएल राहुल की ऋषभ पंत?

चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये भारताचे आघाडीचे चार फलंदाज निश्चित आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरले. पाचव्या क्रमांकावर कुणाला संधी दिली जाणार? पंत आणि केएल राहुल यांच्यामध्ये या जागेसाठी स्पर्धा आहे. पण सूत्रांच्या महितीनुसार, टीम इंडिया केएल राहुल याच्यासोबत मैदानात उतरणार आहे. डावखुऱ्या फलंदाजाची गरज पडल्यास अक्षर पटेल याला प्रमोट करण्यात येईल. इंग्लंडविरोधातील वनडे मालिकेत रोहितने हा प्रयोग केला होता. त्यामुळे ऋषभ पंत याला बेंचवरच बसावे लागेल.

Team India Predicted Playing XI vs Bangladesh
Chhaava : छावा पाहिल्यावर माजी क्रिकेटरने व्यक्त केला संताप, 'छत्रपती संभाजी महाराज यांच्या..'

फिरकी गोलंदाज कोण कोण?

अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांचे संघातील स्थान निश्चित मानले जातेय. त्याशिवाय हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाला संतुलन मिळतेय. तीन अष्टपैलू खेळाडूंसह टीम इंडिया मैदानात उतरेल. अक्षर पटेल आणि रवींद्र जाडेजा यांच्या जोडीला तिसरा फिरकी गोलंदाज कोण? वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यामध्ये स्पर्धा आहे. सूत्रांच्या महितीनुसार कुलदीप यादव याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

हर्षित राणा बेंचवरच -

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये वेगवान गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी याच्या खांद्यावर आहे. त्याच्या जोडीला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला संघात स्थान मिळू शकते. हार्दिक पांड्या, शमी आणि अर्शदीप हे भारताचे तीन वेगवान गोंलदाज असतील. त्यामुळे हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती यांना बेंचवरच बसावे लागेल.

भारताची संभाव्य प्लेईंग ११ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जड़ेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

बांगलादेशची संभाव्य प्लेईंग ११ : तंजीद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह, जेकर अली/तौहीद हृदोय, नसुम अहमद, तस्कीन अहमद, नाहिद राणा, तंजीम साकिब/मुस्तफिजुर रहमान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com