Chhaava : छावा पाहिल्यावर माजी क्रिकेटरने व्यक्त केला संताप, 'छत्रपती संभाजी महाराज यांच्या..'

Chhaava Movie Reaction : छावा चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. दरम्यान एका भारताचा माजी क्रिकेटपटूने छावा पाहिल्यावर एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने संताप व्यक्त केला आहे.
Chhaava Movie
Chhaava MovieSaam Tv
Published On

विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेल्या या चित्रपटाची लहानांपासून थोरांपर्यंत चर्चा आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांचे प्रेम मिळत आहे. दरम्यान हा चित्रपट पाहिल्यानंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रतिक्रिया देत एक प्रश्न उपस्थित केला आहे.

छावा चित्रपट पाहिल्यानंतर आकाश चोप्राने एक्स या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने 'आज छावा पाहिला. शौर्य, निस्वार्थी भाव आणि कर्तव्याच्या जाणिवेची अविश्वसनीय कथा. पण खरा प्रश्न हा आहे की, आम्हाला शाळेत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल का शिकवलं नाही? त्यांचा कुठेही उल्लेख नव्हता,' असे म्हटले आहे.

संभाजी महाराजांबद्दल शाळेत काही शिकलो नाही. पण अकबर हा एक महान आणि न्यायी सम्राट कसा होता हे आम्हाला शिकवले. दिल्लीतल्या प्रमुख रस्त्याला औरंगजेबाचे नाव दिले आहे. हे असं का आणि कसं झालंय? असे आकाश चोप्राने पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टच्या खाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Chhaava Movie
Chhaava Movie Collection: 'छावा' समोर 'पुष्पा २' ची जादू फेल; सोमवारी इतकी कमाई करुन केला नवा रेकॉर्ड

१४ फेब्रुवारी रोजी छावा चित्रपट भारतासह जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने आत्तापर्यंत १५० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे कलेक्शन केले आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा अशी या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

Chhaava Movie
Rashmika Mandanna: 'साऊथ इंडीयन मुलगी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत...'; अशी झाली रश्मिकाची निवड, अभिनेत्रीची ती पोस्ट चर्चेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com