RCB जर IPL 2025 जिंकले तर एक दिवसाची सुट्टी; चाहत्याच्या विनंतीवरून ऐतिहासिक निर्णय जाहीर करणार?

Royal Challengers Bengaluru IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, तो फॉर्म पाहता आयपीएल २०२५ आरसीबी जिंकेल असा चाहत्यांना विश्वास आहे. अशात आरसीबीच्या एका चाहत्याच्या चिठ्ठीची चर्चा होत आहे.
Royal Challengers Bengaluru
Royal Challengers Bengalurux
Published On

Royal Challengers Bengaluru ने पंजाब किंग्सचा पराभव करुन आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आरसीबीच्या चाहत्यांच्या संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच कामगिरी पाहता बंगळुरूचा संघ यंदा आयपीएलची ट्रॉफी जिंकू शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच एका आरसीबीच्या एका चाहत्याने केलेल्या आवाहनाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना संघाच्या विजयाबाबत विशेष आवाहन केले आहे. त्याने सिद्धरामय्या यांना एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये जर बंगळुरूने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकली, तर आरसीबी फॅन्स फेस्टिव्हल डे म्हणून सार्वजनिक सुट्टी द्यावी असे लिहिलेले आहे.

Royal Challengers Bengaluru
Mi Vs GT : गुजरातला Eliminator मध्ये हरवलं तरीही IPL 2025 जिंकण्यापासून मुंबई राहणार दूर? आकडेवारीने टेन्शन वाढवलं

आरसीबीच्या चाहत्यांना विजय साजरा करण्यासाठी एक दिवस सुट्टी मिळावी अशी विनंती चाहत्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक शहरातील एका रहिवाशाने ही चिठ्ठी मुख्यमंत्र्यांना पाठवल्याचे म्हटले जात आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Royal Challengers Bengaluru
RCB च्या 'इ साल कप नमदे'साठी मुंबईचा पराभव आवश्यक; गुजरात टायटन्सच्या कामगिरीकडे लक्ष

आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर १ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर आरसीबीचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना सुरु आहे. हा सामना जो जिंकेल, तो क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना दिसेल. क्वालिफायर २ जिंकणाऱ्या संघाविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ३ जून रोजी फायनल खेळेल.

Royal Challengers Bengaluru
Mumbai Indians : ...तर मुंबई इंडियन्स बाहेर जाईल! IPL चा नियम ठरणार कर्दनकाळ, नेमकं प्रकरण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com