
IPL 2025 च्या क्वालिफायर १ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सवर सहज विजय मिळवला. विजयासह आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली. बंगळुरूने २०१६ नंतर नऊ वर्षांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फक्त एक अंतिम सामना बाकी आहे, तो जिंकला की बंगळुरूचे 'इ साल कप नमदे'चे स्वप्न पूर्ण होईल. यंदाच्या वर्षी कामगिरी पाहता बंगळुरूचा संघ आयपीएल ट्रॉफी जिंकेल असा चाहत्यांना विश्वास आहे.
आयपीएल २०२५ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जिंकेल, पण जर मुंबई इंडियन्सने फायनलमध्ये प्रवेश केला, तर त्यांचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगू शकते असा दावा भारताची माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केला आहे. जर बंगळुरूला आयपीएल जिंकायची असेल, तर एलिमिनेटर सामन्यात गुजरातने मुंबईवर विजय मिळवायलाच हवा. मुंबई फायनलपर्यंत पोहोचला कामा नये, मुंबईला रोखायला हवे असे वक्तव्य अश्विनने केले.
फायनलमध्ये मुंबईचा सामना करावा लागू नये यासाठी बंगळुरू प्रार्थना करत असेल. मुंबई इंडियन्स हा आरसीबी विरुद्ध जिंकण्याची संधी असलेला एकमेवसंघ आहे. तसं पाहायला गेलं तर काहीही होऊ शकतं. पण जर मी आरसीबीमध्ये असतो, तर फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा सामना करणे मला आवडलं असतं, असे आर अश्विन म्हणाला.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना खेळला जाणार आहे. यापैकी जो संघ जिंकेल, तो संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळेल. जर मुंबईने दोन्ही संघांना पराभूत केले आणि मुंबईचा संघ फायनलमध्ये गेला, तर आरसीबीचे नुकसान आहे. तेव्हा मुंबईला एलिमिनेटरमधूनच बाहेर पडणे आरसीबीच्या दृष्टीने योग्य आहे, असे अश्विनचे मत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.