Mumbai Indians : ...तर मुंबई इंडियन्स बाहेर जाईल! IPL चा नियम ठरणार कर्दनकाळ, नेमकं प्रकरण काय?

MI Vs GT Eliminator Match : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२५ मधील एलिमिनेटर सामना मुल्लानपूरमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना जर रद्द झाला, तर कोणत्या संघाला फायदा होईल? जाणून घ्या...
Mumbai Indians
Mumbai Indiansx
Published On

मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हे दोन संघ आयपीएल २०२५ मधील एलिमिनेटर सामना मुल्लानपूरमध्ये खेळणार आहेत. जो संघ एलिमिनेटर सामन्यात पराभूत होईल, त्या संघाचे आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. पण जर पावसामुळे किंवा अन्य कारणांमुळे हा सामना रद्द झाला, तर काय होईल? चला जाणून घेऊयात...

एलिमिनेटर सामन्याच्या दिवशी मुल्लानपूरमध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि सामना रद्द झाला, तर मुंबई इंडियन्सचा संघ एलिमिनेटर सामना न खेळताच आयपीएलमधून बाहेर पडेल. आयपीएलच्या नियमांनुसार, एलिमिनेटर सामना रद्द झाल्यास पॉईंट्स टेबलवर आघाडीवर असलेला संघ क्वालिफायर २ सामन्यासाठी पात्र ठरेल.

Mumbai Indians
मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का! Eliminator Match पूर्वी दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त? Video मुळे वाढलं टेन्शन

पॉईंट्स टेबलवर गुजरात टायटन्स १८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. जर उद्या पाऊस किंवा अन्य कोणत्या कारणामुळे एलिमिनेटर सामना रद्द झाला. तर जास्त गुण असल्याने गुजरातचा संघ क्वालिफायर २ मध्ये जाईल. कमी गुणांमुळे मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात येईल.

Mumbai Indians
RCB चे 'Top 2' मध्ये राहणे, हेच चाहत्यांच्या चिंतेचे कारण! तुम्ही फॅन असाल तर नक्की ही बातमी वाचाल

आयपीएलच्या नियमांनुसार, एलिमिनेटर सामन्यासाठी रिझर्व्ह डेचा पर्याय उपलब्ध नाहीये. क्वालिफायर २ सामना आणि फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डेची तरतूद आहे. जर या दोन सामन्यांदरम्यान पावसाने खेळ रद्द झाला, तर रिझर्व्ह डेच्या दिवशी सामना खेळवला जाईल. एलिमिनेटर सामन्यासाठी रिझर्व्ह डे नसल्याने आयपीएल मॅनेजरमेंटवर टीका झाली होती.

Mumbai Indians
फक्त नेताच नाही तर आधी क्रिकेटरही हुंडा प्रकरणात अडकला; बायकोचा छळ अन् पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com