
IPL 2025 मधील क्वालिफायर १ हा सामना पंजाबच्या महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन संघ क्वालिफायर १ मध्ये आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांनी दमदार खेळ करत क्वालिफायर १ मध्ये प्रवेश केला आहे, हा सामना जो संघ जिंकेल तो थेट आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२५ मध्ये चांगली खेळी केली आहे. आरसीबीसाठी गोलंदाजी हा नेहमीच डोकेदुखी ठरणारी बाजू ठरत असे. यंदा त्यांनी गोलंदाजी विभागावर काम केल्याचे पाहायला मिळते. बंगळुरूचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. एकूणच सांघिक खेळ केल्याने आरसीबी पॉईंट्स टेबलवर टॉप २ मध्ये आहे.
पंजाब किंग्स आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलवर अव्वलस्थानी आहे, तर रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने दुसरे स्थान पक्के केले आहे. आयपीएलचा इतिहास पाहता, टॉप २ मध्ये असणे आरसीबीसाठी धोकादायक आहे. आरसीबीने २०११ आणि २०१६ या दोन वर्षात क्वालिफायर १ सामना खेळला होता. दोन्ही वर्षी आरसीबीचा संघ टॉप २ मध्ये होता आणि दोन्ही वेळेस बंगळुरूला आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नव्हती.
आयपीएलच्या इतिहासात बंगळुरूने फक्त दोनदा क्वालिफायर १ सामना खेळला आहे. २०११ मध्ये बंगळुरूचा संघ पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानी होता. तेव्हाच्या क्वालिफायर १ सामन्यात चेन्नईने बंगळुरूला हरवले. पुढे क्वालिफायर २ जिंकून बंगळुरूचा संघ पुन्हा चेन्नईसमोर फायनलमध्ये खेळला. पण तेव्हा चेन्नईने पुन्हा एकदा बंगळुरूचा पराभव केला. तेव्हा २०११ मध्ये बंगळुरू (प्रथम स्थान) आणि चेन्नई (द्वितीय स्थान) असे टॉप-२ होते.
२०१६ मध्ये गुजरात लायन्स हा संघ पहिल्या स्थानावर होता, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. गुजरात विरुद्ध बंगळुरू असा क्वालिफायर १ सामना खेळण्यात आला. बंगळुरूने गुजरातचा धुव्वा उडवत फायनलमध्ये प्रवेश केला. पण २०१६ च्या फायनलमध्ये सनरायजर्स हैदराबादने बंगळुरूच्या ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.