IPL PBKS vs RCB: क्वॉलिफायर १ चा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? कोणाचा मार्ग होईल खडत्तर

IPL : आयपीएल २०२५स्पर्धेतील क्वॉलिफायरचा पहिला सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. हा सामना 29 मे रोजी होणार आहे.
IPL
IPL PBKS vs RCB Saam tv
Published On

आयपीएल २०२५ आता अंतिम टप्प्यात आलीय आलीय. आता क्लॉलिफायरचे सामने खेळले जाणार असून पहिला सामना हा पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्समध्ये होणार आहे. हा सामना २९ मे रोजी होणार आहे. आयपीएल ऐन मोसमात आली असताना देशात मान्सूनचे आगमन झालंय. देशातील विविध ठिकाणी मान्सूनचा पाऊस होतोय.

त्यामुळे आयपीएलच्या क्लॉलिफायरच्या सामन्यावर पावसाचे संकट आहे. जर पहिल्या क्लॉलिफायर सामन्यात पाऊस झाला तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल असा प्रश्न अनेक क्रिकेट रसिकांना पडला असेल. तर काळजी नका करू आम्ही तुमच्या मनातील प्रश्नाचे निरसन करू. चालू सामन्यात पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? त्याचं काय नियम ते जाणून घेऊ. आयपीएल २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना संपलेत.

IPL
Rishabh Pant: अखेरच्या सामन्यात पंतचा तुफानी खेळ; शतकानंतर ऋषभचं धमाकेदार सेलिब्रेशन, Video Viral

तर उद्यापासून म्हणजेच २९ मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. पहिल्या क्वॉलिफायर सामन्यात पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने येणार आहेत. हा सामना मोहालीच्या मुल्लांपूर स्टेडियममध्ये खेळला जातोय. या सामन्यातील विजेता संघाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी एकमेकांना जबरदस्त भिडत देतील, यात काही शंका नाही. पण या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर ? त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली तर अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल? याचा निर्णय काही नियमानुसार घेतला जाईल.

IPL
IPL 2025 : पंजाबचा विजय, मुंबई पराभूत! Qualifier 1 मध्ये PBKS ची जागा पक्की, MI पलटनला जोरदार धक्का

आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्स आणि आरसीबी या दोन्ही संघांना जेतेपद हवे आहे. या दोन्ही संघांची जेतेपदाचं स्वप्न मागच्या पर्वात पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे स्वप्नपूर्तीसाठी दोन्ही संघ सर्वस्वी पणाला लावतील. पण पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्याची वेळ आली तर? त्यावेळेस प्रत्येकी एक एक गुण वाटला जाईल. पण अंतिम फेरीचं तिकीट कोणाला मिळेल. तर एका संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल तर दुसरा संघ क्वॉलिफायरचा दुसरा सामना खेळेल.

परंतु याचा फायदा पॉईट्स टेबलमध्ये टॉपवर असलेल्या संघाला याचा फायदा मिळेल. म्हणजेच पंजाब किंग्स संघाकडे थेट अंतिम फेरी गाठता येईल असे पॉइंट्स आहेत. तर आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. दोन्ही संघांकडे १९ पॉईंट्स आहेत, पण पंजाब नेट रनरेटच्या बाबतीत पुढे आहे. जर क्वालिफायर-1 सामना रद्द झाला तर पंजाब किंग्स अंतिम फेरीत पोहोचेल आणि आरसीबीला क्वालिफायर-2 खेळावे लागणार आहे.

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्याकडे १९ पॉई्ट्स आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरीत ९ सामने जिंकलेत. तर ४ सामन्यात पराभूत झालेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना एक-एक पॉईट मिळालाय. पण पंजाब किंग्स आरसीबीपेक्षा +०.०७१ नेट रनरेटने पुढे आहे. पंजाब किंग्सचे +०.३७२, आरसीबीचा ०.३०१ नेट रनरेट आहे. त्यामुळे पंजाबचा संघ टॉपवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com