
Vaishnavi Hagawane News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात न्यायालयाने हगवणे कुटुंबाला पोलीस कोठडी सुनावली. या दरम्यान हगवणेंच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाची चर्चा पाहायला मिळाली. वैष्णवी नको त्या व्यक्तीबरोबर चॅट करत होती, असे हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांनी केले होते. त्यांच्या युक्तिवादावर वैष्णवीच्या वडिलांनी, अनिल कस्पटे यांनी भाष्य केले.
'वैष्णवीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर होता. ती नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती. वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅट करत होती, त्या व्यक्तीने नाही म्हटल्याने वैष्णवीने आत्महत्या केली असावी. संबंधित व्यक्तीचा १८ तारखेला साखरपुडा झाला. त्या व्यक्तीसंबंधित माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. आता पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घ्यावा, चॅटिंगचा आत्महत्येशी संबंध आहे का हे त्यांनी तपासावे. वैष्णवीच्या व्हॉट्अप चॅट्स आम्ही व्हायरल केले असते. पण फक्त तिच्या माहेरी कळवले', असे हगवणेंच्या वकिलांनी म्हटले होते.
वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेमध्ये हगवणे वकिलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. 'मोबाईल चॅटिंगबाबत आम्हाला काहीच कल्पना नाही. त्यांनी आम्हाला कुठलीही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीवर, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात आहे. आत्महत्या करण्याआधी पाच ते सहा दिवस हगवणे कुटुंब वैष्णवीला मारहाण करत होते. तिच्यावर आता शिंतोडे उडवू नका', असे वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.
हगवणे कुटुंबाला दिलेल्या गाडीचे आणि जावयाला दिलेल्या मोबाईलचे बिल वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. आम्ही आधी एमजी हेक्टर कार बुक केली होती, त्यांनी ती नाकारली आणि फॉर्च्युनरची मागणी केली. शशांकने आमच्याकडून दीड लाखांचे मोबाईल घेतले. त्याचे हफ्ते मी आजही भरतोय, असे अनिल कस्पटे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.