
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यूने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यापायी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. पण तिच्या आईवडिलांनी वैष्णवीने आत्महत्या केली नाहीये, तिची हत्या झाली आहे असा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा सासरा, सासू, पती, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे हुंडाबळी ही समस्या पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला राजकारणाची किनार असल्याचे म्हटले जात आहे. तिचे सासरे राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे मोठे पदाधिकारी होते. ही घटना समोर आल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजकीय पार्श्वभूमीप्रमाणे, क्रिकेट विश्वाशी निगडीत हुंडाबळीच्या जुन्या प्रकरणाची आठवण झाली आहे. तेव्हा हुंडा घेतल्याने एका भारतीय क्रिकेटपटूला अटक करण्यात आली होती.
२०१२ मध्ये संजय सातपथी या क्रिकेटपटूच्या पत्नीने त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात संजयच्या पत्नीने पोलिसांत तक्रार केली होती. तक्रार केल्यानंतर संजयला अटक झाली होती. संजयच्या पत्नीने, स्वप्नाने संजय आणि त्याच्या भावावर शारीरिक-मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. कलम ४९८ (अ), कलम २९४, कलम ३२३, कलम ५०६ आणि कमल ३४ तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत संजयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संजय फरार झाला होता. ओडिशा पोलिसांनी जगन्नाथपुरी येथून त्याला अटक केली होती. त्यानंतर संजय जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आला होता. १० महिन्यांच्या मुलाला घेऊन तो पुन्हा फरार देखील झाला होता. त्यानंतर संजयच्या मुलाला त्याच्या आईकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
संजय सातपथी हा रणजीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळायचा. तो ऑफ-ब्रेक गोलंदाज होता. ६३ प्रथमश्रेणी सामन्यांत २७.८१ च्या सरासरीने त्याने २०८ विकेट्स घेतल्या होत्या. २००७ पर्यंत तो क्रिकेटजगतात सक्रीय होता. तो भुवनेश्वरच्या एका खासगी टेलिकॉम कंपनीमध्ये काम करत असल्याचे म्हटले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.