सासू-नणंदेनं मारलं, अंगावर थुंकली; वैष्णवी हगवणेच्या छळाची कहाणी सांगताना आईवडिलांना कोसळलं रडू

Vaishnavi Hagawane Case : राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा, वैष्णवी हगवणेचा १६ मे रोजी मृत्यू झाला. हगवणे कुटुंबाकडून झालेल्या छळामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचे तिच्या आईवडिलांनी म्हटले आहे.
Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane CaseSaam Tv
Published On

राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने, वैष्णवीने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात म्हटले गेले. वैष्णवीच्या जाण्याने तिच्या माहेरी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले आहे. सासरी हुंड्यावरुन वैष्णवीला त्रास दिला जात होता असे तिच्या आईवडिलांनी म्हटले आहे.

'प्रेमविवाह केल्याने वैष्णवी तिच्या त्रासाबद्दल काही सांगायची नाही. ती सगळं लपवत होती. सासरकडच्यांनी गौरी गणपतीच्या सणात चांदीच्या गौराई मागितल्या. तेव्हा पहिल्यांदा तिने दिला जाणाऱ्या त्रासाबद्दल रडत-रडत सगळं सांगितलं. ते मानसिक आणि शारीरिक त्रास देत असत. वैष्णवीने हळूहळू सर्वकाही सांगायला सुरुवात केली. दरवेळी तिला मारहाण होत असे', असे वैष्णवीच्या आईने म्हटले.

Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane : ५१ तोळे सोनं, आलिशान गाडी तरीही, छळ... राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी?

दोन महिन्यांपूर्वी वैष्णवीच्या नणंदेने तिला मारहाण केली होती. ती वैष्णवीच्या अंगावर थुंकली होती. तिच्या सासूने आणि नणंदेने तिला बालेवाडीपर्यंत आणले. कारमध्ये त्रास सहन न झाल्याने तिने गाडीतून उडी टाकेन असे म्हटले, तेव्हा वैष्णवीला माहेरी आणले. सासू आणि नणंदेचे मी पाय धरले. माझ्या लेकीकडून चूक झाली असेल तर माफ करा मी तुमची माफी मागतो असे म्हटल्याचे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले.

Vaishnavi Hagawane Case
वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

वैष्णवीचे वडील म्हणाले, 'लग्नानंतर पाच ते सहा महिन्यांनी वैष्णवीचा छळ सुरु झाला. ती घरी आली की पप्पा पैसे द्या म्हणायची. हगवणे कुटुंबाने तिला खूप त्रास दिला. लग्नात मी साडेसात किलोची चांदीची ५ ताटं, ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी दिली होती. जावयाला सोन्याची अंगठी, दीड लाखांचा फोन दिला होता. दर दीड-दोन महिन्यांनी ती जेव्हा घरी यायची, तेव्हा ५० हजार-१ लाख रुपये द्यायचो.'

Vaishnavi Hagawane Case
Pune News : हुंड्यासाठी छळ अन्...; अजितदादांच्या बड्या नेत्याच्या सुनेनं जीवन संपवलं, पुण्यातील NCP चा शिलेदार कारवाईच्या भोवऱ्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com