Viral Video : बस कंडक्टरचा माजुरडेपणा समोर; वृद्ध आजी-आजोबांना खाली उतरवलं अन्..., पाहा व्हायरल व्हिडिओ

Nandurbar News : नंदुरबारमधील शिरपूर बस आगारामध्ये एका बस कंडक्टरची मुजोरी समोर आली आहे. या बस कंडक्टरने एका वृद्ध आजी-आजोबांना अपमानास्पद वागणूक दिल्याचे व्हिडीओमध्ये कैद झाले आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

सागर नाईकवाडे, साम टीव्ही, प्रतिनिधी

नंदुरबारच्या शिरपूर आगारामधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर आगारातील एका बसमधील कंडक्टरचा उर्मटपणा समोर आला आहे. बस कंडक्टरने एका वृद्ध जोडप्याला बसमधून खाली उतरवले, त्यांच्यासोबत अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध आजी-आजोबा ज्या बसमध्ये बसले होते, ती बस खराब झाली होती. त्यानंतर ते शिरपूर आगाराच्या दुसऱ्या बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कंडक्टरने वृद्ध जोडप्याला अडवले. बसमध्ये चढत असताना कंडक्टरने 'ओ आजी चला ना.. कसं समजतं नाही तुम्हाला, गाडी खाली असती तर ठिक होतं. पण बघा ना किती लोड आहे' असे म्हटले.

Viral Video
Accident News : वाहनाचा दोर तुटला अन् अनर्थ घडला; डीजे जनरेटरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

वृद्ध आजी-आजोबा अपमानास्पद वागणूक देताना, त्यांना बसमधून खाली उतरवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. वृद्ध दांपत्यांना उद्देशन बस कंडक्टरने 'हे फुकट प्रवास करणारे लोक आहेत, अधिकारी असते, तर वेगळी गोष्ट असती' असे म्हटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंडक्टरच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Viral Video
Ladki Bahin Yojana : या लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार येणार, कारण आलं समोर

एका वृद्ध जोडप्याची बस खराब झाली. त्यांनी दुसऱ्या बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बस कंडक्टरने अडवले. आत जागी नाहीये असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली. ही घटना एका प्रवाशांने मोबाईलमध्ये कैद केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बस कंडक्टरविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे, त्याच्यावर कारवाई व्हावी असेही नेटकरी म्हणत आहेत.

Viral Video
Vaishnavi Hagawane : वैष्णवीचं बाळ लपवणारे कोण? हापापलेल्या हागवणेंची खुनशी मानसिकता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com