
IPL 2025 मधला एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल, तो क्वालिफायर २ मध्ये जाईल. ज्या संघाचा पराभव होईल, त्या संघाचे यंदाच्या सीझनमधील आव्हान संपुष्टात येईल. मुंबई आणि गुजरात या दोन्ही संघांसाठी उद्याचा सामना महत्त्वपूर्ण आहे.
एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला दुहेरी धक्का लागला असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईच्या संघातील दीपक चहर आणि तिलक वर्मा हे दोन स्टार खेळाडू जखमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोघे एलिमेटर सामना खेळतील की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दीपक चहर आणि तिलक वर्मा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दीपक चहर आणि तिलक वर्मा दोघेही विमानतळावर प्रवेश करत असल्याचे पाहायला मिळते. दोघांनाही चालताना संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळते. दीपक चहर व्हिडीओमध्ये लंगडत असल्याचे दिसते. त्याच्यापाठोपाठ तिलक वर्मा विमानतळावर प्रवेश करताना दिसतो. या व्हिडीओमुळे चहर आणि वर्मा दुखापतग्रस्त असल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यादरम्यान दीपक चहरला दुखापत झाली होती. तो गुजरात विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात सहभागी होणार नसल्याच्याही चर्चा आहेत. त्याच सामन्यात, तिलक वर्माच्या गुडघ्यालाही दुखापत झाल्याचे म्हटले जात होते. जर हे दोन खेळाडू एलिमिनेटर सामन्यात खेळले नाही, तर मुंबईचे मोठे नुकसान होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.