Phil Salt : 6, 4, 4, 4, 6, 4... स्टार्कला धू-धू-धुतलं, पण विराटच्या एका चुकीने फिल सॉल्टला माघारी जावं लागलं

RCB VS DC Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात फिल सॉल्ट जबरदस्त फलंदाजी करत होता. त्याने मिचेल स्टार्कला एका ओव्हरमध्ये ३० धावा ठोकल्या. पण विराटच्या चुकीने त्याची विकेट पडली.
phil salt
phil saltx
Published On

RCB VS DC IPL 2025 Highlights : चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी फिल सॉल्ट आणि विराट कोहली हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलामीवीर मैदानात उतरले.

सलामीसाठी आलेला फिल सॉल्ट चांगल्याच फॉर्ममध्ये दिसला. दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला. त्याच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सॉल्टने सिक्स मारला. लगेच त्याने पाचव्या बॉलवर शानदार फोर मारला. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कची सॉल्टने अक्षरक्ष: धुलाई केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये 6, 4, 4, 5NB, 6, 1LB, 6LB अशा प्रकारे फिल सॉल्टने 30 धावा केल्या.

phil salt
Mumbai Indians रोहितची टीम नाहीये, ती हार्दिकची... अंबाती रायडू आणि संजय बांगर यांच्यात बाचाबाची, Video व्हायरल

चौथ्या ओव्हरमध्ये अक्षर पटेल गोलंदाजी करत असताना एका चुकीमुळे फिल सॉल्ट रनआउट झाला. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर फिलने शॉट मारला. तो बॉल विपराज निगमकडे गेला. विपराजने बॉल केएल राहुलकडे थ्रो केला. याच दरम्यान सॉल्टने क्रीज सोडली होती. बॉल राहुलकडे जातोय हे पाहताच विराट कोहली मागे फिरला. पण सॉल्ट स्ट्राईकर एन्डला पोहोचायच्या आत राहुलने बॉलने स्टंप उडवून सॉल्टला माघारी पाठवले. विराटने मागे फिरण्याचा कॉल उशिरा दिल्याने सॉल्ट रनआउट झाला.

phil salt
Ambati Rayudu : आनंद पोटात मावेना... धोनी पुन्हा CSK चा कॅप्टन, अंबाती रायडूची खुसखुशीत प्रतिक्रिया; Video व्हायरल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11 -

फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

phil salt
Olympic 2028 मध्ये क्रिकेटची एन्ट्री, पण विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मिळणार नाही खेळायची संधी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com