
Mumbai Indians IPL 2025 : ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ मध्ये मागे पडला आहे. मुंबईने ५ सामन्यांपैकी ४ सामने गमावले आहेत. पॉईंट्स टेबलवर मुंबई आठव्या क्रमावर आहे. मुंबईच्या प्लेईंग ११ मध्ये सतत बदल होत असल्याचे पाहायला मिळते. मुंबईच्या पराभवावर चर्चा करत असताना अंबाती रायडू आणि संजय बांगर यांच्या बाचाबाची झाली.
क्रिकइन्फोच्या टाइम आउटमध्ये संजय बांगर यांनी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळण्याचा मुंबईचा निर्णय चुकीचा असल्याचे विधान केले. 'रोहितची मैदानावरची उपस्थिती, त्याचे नेतृत्त्व कौशल्य आणि रणनीती क्षमता अमूल्य आहे. तो मैदानात असणे नेतृत्त्वाच्या दृष्टिने फायदेशीर आहे. तो कदाचित हार्दिक पंड्याला योग्य मार्गदर्शन करु शकला असता', असे संजय बांगर म्हणाले.
बांगर यांच्या वक्तव्यावर लगेच अंबाती रायडून प्रतिक्रिया दिली. हार्दिक पंड्याला त्याच्या मनाप्रमाणे कर्णधारपदाचे निर्णय घेऊ द्यावेत असे रायडूने म्हटले. 'हार्दिकला मार्गदर्शनाची गरज आहे, असे मलातरी वाटत नाही. कर्णधार म्हणून त्याचे निर्णय त्याला घेऊ द्यावेत. मुंबई त्याचा संघ आहे, त्याला त्याची-त्याची मते आहेत. गेल्या वर्षाप्रमाणे तुम्ही १० लोकांचे निर्णय हार्दिकवर लादू शकत नाही. रोहित शर्मा भारतचा कर्णधार आहे आणि कर्णधारपद असताना इतर कोणी निर्णयात हस्तक्षेप करु नये असे प्रत्येकाला वाटत असते. हार्दिकच्या बाबतीतही हाच दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे', असे अंबाती रायडू म्हणाला.
संजय बांगर म्हणाले, 'तुझ्यासाठी हे वेगळं आहे कारण तू कोणत्याही आयपीएल संघाचं नेतृत्त्व केल नाहीयेस. पण इथे अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत. ज्याने अनेक आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत.' यावरुन रागात अंबाती रायडू म्हणाला, 'हा रोहितचा संघ नाही. मुंबई इंडियन्स हा हार्दिक पंड्याचा संघ आहे. रोहित महान लीडर आहे. आपण सर्वजण मानतो. पण हा संघ हार्दिकचा आहे. त्याला जे योग्य वाटेल त्याने तेच करावे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.