Ambati Rayudu : धोनीवरुन कॉमेंट्री बॉक्समधील वातावरण तापलं, सिद्धू-सेहवागला अंबाती रायडू भिडला

Ambati Rayudu MS Dhoni : आयपीएल २०२५ मध्ये अंबाती रायडू समालोचन (कॉमेंट्री) करत आहे. पण सतत धोनीच्या नावाचा जप करत असल्याचा आरोप रायडूवर होत आहे. त्याचा कालच्या सामन्यादरम्यानचा कॉमेंट्री बॉक्समधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Ambati Rayudu Commentary
Ambati Rayudu Commentaryx
Published On

अंबाती रायडू मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. रायडू आयपीएल २०२५ मध्ये समालोचक म्हणून काम करत आहे. समालोचन म्हणजेच कॉमेंट्री करताना तो सतत महेंद्रसिंह धोनीचे कौतुक करताना दिसला होता. चेन्नईचा सामना नसूनही नेहमी धोनी-धोनी करत असल्याने रायडूला ट्रोल केले जात आहे. याच दरम्यान रायडूचा इतर समालोचकांशी वाद झाल्याचे देखील पाहायला मिळाले.

काल गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान अंबाती रायडू, आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करत होते. त्यावेळेस आकाश चोप्राने परवाच्या पंजाब विरुद्ध चेन्नई या सामन्याचा उल्लेख केला. आकाश चोप्रा म्हणाला, 'अनकॅप्ट खेळाडूचा विषय निघाला आहे, (धोनीला उद्देशून) एक असाच झारखंडचा खेळाडू आहे, जो हॅलिकॉप्टर शॉट खेळतो. कालच्या सामन्यात त्यांनी दमदार बॅटिंग केली. पण थोडा उशीर झाला त्यांना यायला...'

Ambati Rayudu Commentary
IPL 2025 : 'सरड्या' वरून राडा! नवज्योतसिंग सिद्धू अन् अंबाती रायुडू Live Tv वर भिडले; कॉमेंट्री बॉक्समधील Video Viral

त्यानंतर स्क्रीनवर महेंद्रसिंह धोनीचा व्हिडीओ प्ले झाला. तेव्हा अंबाती रायडू म्हणाला, 'हे पाहा आले आमचे थाला.. काय जबरदस्त खेळ केला त्यांनी कालच्या सामन्यात.. इन्टेंट घेऊनच मैदानात उतरले होते. कॉमेंट्री बॉक्समध्ये एनर्जी वाढत आहे सिक्स (छक्का) पाहून.. ते पाहा कव्हर्सच्या वर काय शॉट मारलाय. हा खेळाडू स्पेशल आहे वीरु पाजी..'

Ambati Rayudu Commentary
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

अंबाती रायडूची फिरकी घेत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, 'हो तो खेळाडू स्पेशल आहेतच. पण तुम्ही म्हणालात एक युवा खेळाडू हॅलिकॉप्टर शॉट मारायचा. मी व्याकरण सुधारत आहे. तो शॉट मारतो' रायडू, सेहवाग आणि आकाश चोप्राचा कॉमेंट्री बॉक्समधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीची पुन्हा स्तुती केल्याने अंबाती रायडूवर पुन्हा एकदा टीका होत आहे.

Ambati Rayudu Commentary
RJ Mahvash : सेक्स लाइफबद्दल युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं मोठं विधान, वाचून अनेकांच्या उंचावल्या भुवया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com