RJ Mahvash : सेक्स लाइफबद्दल युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंडचं मोठं विधान, वाचून अनेकांच्या उंचावल्या भुवया

RJ Mahvash Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावशचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महावश एक्सबॉयफ्रेंड्स, सेक्स लाईफ अशा गोष्टींवर बोलली आहे.
RJ Mahvash Yuzvendra Chahal
RJ Mahvash Yuzvendra ChahalInstagram
Published On

RJ Mahvash Video : युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या दरम्यान युझी चहल आणि आरजे महावश यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काल फक्त युजवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी महावश पंजाबचा सामना पाहायला गेली होती. यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांवर खऱ्या असल्याचे म्हटले जात आहे.

आरजे महावशचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. महावशला पूर्वीच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचे उत्तर देताना तिने रिलेशनशिप, सेक्स लाइफ यांवर भाष्य केले. आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलताना आरजे महावश म्हणाली, 'मी त्या व्यक्तीसोबत (एक्स बॉयफ्रेंड) ६ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ३ वर्ष मी त्याला डेट केले आणि आमचा साखरपुडा होऊन ३ वर्ष झाली होती. पण मी त्याच्यासोबत कधीही शारीरिक संबंध ठेवले नाही.'

RJ Mahvash Yuzvendra Chahal
Anaya Bangar : माझ्या मम्मीची सून बनशील का? लिंग परिवर्तन केलेल्या संजय बांगरच्या लेकाला लग्नाची ऑफर

'लग्नानंतरच शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे असे मला वाटते. त्यामुळे मी फिजिकल झाले नाही. मी एवढंच म्हणू शकते की शारीरिक संबंध ही एक भावना नाहीये. ती एक जबाबदारी आहे, जी लग्नानंतर पूर्ण करावी लागते', असे वक्तव्य आरजे महावशने व्हिडीओमध्ये केल्याचे पाहायला मिळते.

RJ Mahvash Yuzvendra Chahal
IPL 2025 : 'सरड्या' वरून राडा! नवज्योतसिंग सिद्धू अन् अंबाती रायुडू Live Tv वर भिडले; कॉमेंट्री बॉक्समधील Video Viral

पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना पाहण्यासाठी आरजे महावश गेली होती. सध्या युजवेंद्र चहल पंजाबकडून आयपीएलमध्ये सहभागी झाला आहे. त्याला कालच्या सामन्यात सपोर्ट करण्यासाठी ती गेली होती. तिने युजवेंद्र चहलसोबतचा फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. या पोस्टखाली चहलने कमेंट केली. यावरुन युझी आणि महावशच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे.

RJ Mahvash Yuzvendra Chahal
RJ Mahvash Yuzi Chahal : मी तुझ्यासाठी आलेय, चहलसाठी आरजे महावशची पोस्ट, युजीचंही प्रेम उफाळून आलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com