RJ Mahvash Yuzi Chahal : मी तुझ्यासाठी आलेय, चहलसाठी आरजे महावशची पोस्ट, युजीचंही प्रेम उफाळून आलं

Yuzvendra Chahal RJ Mahvash : आरजे महावश कालचा पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना पाहण्यासाठी गेली होती. हा सामना संपल्यानंतर महावशने युजवेंद्र चहलसोबतचे फोटो शेअर केले आहे. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Yuzvendra Chahal RJ Mahvash
Yuzvendra Chahal RJ MahvashInstagram
Published On

युजवेंद्र चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. धनश्री वर्माला घटस्फोट दिल्यानंतर आता चहल आरजे महावशसोबत असल्याच्या चर्चांना उधाण आहे. अशातच महावशने शेअर केलेल्या पोस्टमुळे चहल-महावश डेट करत असल्याच्या चर्चांना शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएल २०२५ मध्ये काल पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सचा विजय झाला. पण पंजाबच्या विजयापेक्षा सामना पाहायला आलेल्या आरजे महावशची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. सामन्यादरम्यान आरजे महावश आणि युजवेंद्र चहल ट्रेंडमध्ये होते. त्यांचे स्टेडियममधील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.

Yuzvendra Chahal RJ Mahvash
Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

आरजे महावश पंजाब विरुद्ध चेन्नई सामना पाहण्यासाठी गेली होती. पण सामन्यापेक्षाही युजवेंद्र चहलला सपोर्ट करण्यासाठी ती स्टेडियमला गेली होती. खुद्द महावशने या गोष्टीचा खुलासा केला. तिने इन्स्टाग्रामवर कालच्या सामन्यातले फोटो शेअर केले. यात तिचा आणि चहलाचा सेल्फी देखील आहे. या फोटोंना महावशने खास कॅप्शन दिले आहे.

Yuzvendra Chahal RJ Mahvash
IPL 2025 : 'सरड्या' वरून राडा! नवज्योतसिंग सिद्धू अन् अंबाती रायुडू Live Tv वर भिडले; कॉमेंट्री बॉक्समधील Video Viral

'आपल्या माणसांच्या वाईट काळात त्यांची साथ देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी! आम्ही सगळे तुझ्यासाठी इथे जमलो आहोत, युजवेंद्र चहल' असे कॅप्शन आरजे महावशने तिच्या फोटोंना दिले आहे. फोटोच्या कमेंटबॉक्समध्ये युजवेंद्र चहलने कमेंट केली आहे. चहलने त्यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला लावला आहे. या सर्व प्रकरणामुळे महावश आणि चहल यांच्या डेटिंगच्या चर्चा या खऱ्या असल्याचे चाहते म्हणत आहेत.

Yuzvendra Chahal RJ Mahvash
Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com