Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

Tilak Varma MI IPL 2025 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना उद्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याआधी सोशल मीडियावर तिलक वर्माची चर्चा पाहायला मिळत आहे.
Tilak Varma
Tilak Varmax
Published On

Tilak Varma Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स हा सामना एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा पराभव झाला. या पराभवाचे खापर प्रामुख्याने तिलक वर्मावर फोडले जात आहे. १९ व्या ओव्हरमध्ये तिलक वर्माला रिटायर्ड आउट करण्यात आले. यावरुन हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यावर देखील टीका होत आहे. हे प्रकरण ताजे असताना तिलक वर्माच्या एका कृतीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यामध्ये मुंबईचा संघ विजयासाठी फलंदाजी करत होता. त्यावेळेस योग्य स्ट्राईक रेट हवा होता. त्यासाठी फटकेबाजी करण्याची गरज होती. पण ते तिलकला जमत नव्हते. त्यामुळे तिलक वर्माला रिटायर्ड आउट करुन मैदानाबाहेर पाठवण्यात आले होते. त्याच्या जागी मिचेल सँटनर फलंदाजीसाठी आला होता.

Tilak Varma
Bumrah Boult Video : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढली! दोन मित्रांचे रियुनियन; आता खरी मजा येणार

तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच तिलक वर्माशी निगडीत एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये तिलक वर्माच्या आधीच्या आणि आताच्या इन्स्टा बायोचा फोटो आहे. जुन्या बायोमध्ये मुंबई इंडियन्सचे नाव असल्याचे दिसते. पण नव्या बायोमध्ये मुंबईचे नाव काढल्याचे पाहायला मिळते. यावरुन तिलकने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन मुंबई इंडियन्सचे नाव काढल्याचे स्पष्ट होत आहे.

Tilak Varma
IPL 2025 सुरु असताना गुजरातच्या कर्णधारानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ती' तरूणी?

व्हायरल होणाऱ्या ट्वीटमुळे मुंबई इंडियन्सच्या संघात काहीतरी बिनसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काहीजण मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्याच्या वेळी रिटायर्ड आउट केल्याने तिलकने असे केल्याचे म्हणत आहेत. एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे तिलक वर्मा नाराज असून मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये काहीतरी बिनसले असल्याच्या चर्चा होत आहेत.

Tilak Varma
Viral : लाईव्ह सामन्यात स्टेडियमची बत्ती गुल, पाकिस्तानचा फलंदाजाला पळायचं कळेना; सोशल मीडियावर उडाली खिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com