IPL 2025 सुरु असताना गुजरातच्या कर्णधारानं गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, कोण आहे 'ती' तरूणी?

Gujarat Captain Wedding : आयपीएल २०२५ ची सगळीकडे चर्चा सुरु आहे. अशातच गुजरात संघाच्या कर्णधाराने गर्लफ्रेंडची लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर लग्नाचा विषय चर्चेत आहे.
Gujarat Captain Wedding
Gujarat Captain WeddingInstagram
Published On

सध्या भारतासह जगभरात आयपीएल २०२५ ची धामधूम पाहायला मिळत आहे. अशातच एका लग्नाच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. डब्लूपीएलमध्ये गुजरात जायंट्स या संघाच्या कर्णधाराने तिच्या गर्लफ्रेंडशी लग्न केले आहे. या महिला क्रिकेटपटूने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे.

डब्लूपीएलमध्ये गुजरातच्या संघाची कर्णधार ॲशले गार्डनरने लॉन्ग टाइम रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. ॲशले गार्डनर तिची गर्लफ्रेंड मोनिका राइटसोबत विवाह बंधनांमध्ये अडकली आहे. एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी निवडक परिवार सदस्य आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रण होते असे म्हटले जात आहे.

Gujarat Captain Wedding
Bumrah Boult Video : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढली! दोन मित्रांचे रियुनियन; आता खरी मजा येणार

ॲशले गार्डनरने लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मिसेस अँड मिसेस गार्डनर' असे म्हटले आहे. या लग्नासोहळ्याला किम गर्थ, फलंदाज ॲलिस विलानी, फोबी लिचफील्ड आणि ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार ॲलिसा हिली उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.

Gujarat Captain Wedding
Accident : होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली, रोलर कोस्टरची राईड करताना आक्रित घडलं, स्टॅण्ड तुटलं अन् डोळ्यासमोर सारं संपलं

ॲशले गार्डनर ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळते. तिच्याकडे डब्लूपीएलमध्ये गुजरात जायंट्सचे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. तिच्या नेतृत्त्वात गुजरातच्या संघाने मागच्या सीझनमध्ये चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ॲशले गार्डनरने ७ कसोटी सामने, ७७ एकदिवसीय सामने आणि ९६ टी-२० सामने खेळले आहेत.

Gujarat Captain Wedding
Viral : लाईव्ह सामन्यात स्टेडियमची बत्ती गुल, पाकिस्तानचा फलंदाजाला पळायचं कळेना; सोशल मीडियावर उडाली खिल्ली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com