NZ VS PAK
NZ VS PAKx

Viral : लाईव्ह सामन्यात स्टेडियमची बत्ती गुल, पाकिस्तानचा फलंदाजाला पळायचं कळेना; सोशल मीडियावर उडाली खिल्ली

NZ VS PAK : न्यूझीलंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना अचानक संपूर्ण स्टेडियमची लाईट गेली. या घटनेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Published on

भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगची धामधूम पाहायला मिळत आहे. आयपीएलची चर्चा होत असताना पाकिस्तान न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला.

दरम्यान न्यूझीलंड-पाकिस्तानच्या तिसऱ्या वनडे सामन्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानची फलंदाजी असताना अचानक स्टेडियमची थोड्या वेळासाठी लाईट गेली. अचानक वीज खंडित झाल्यामुळे खेळ थांबला. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

NZ VS PAK
Dhoni-Jadeja : जडेजाचा थ्रो आणि धोनीची स्टंपिग, चेपॉकच्या मैदानात दिसली जबरदस्त केमिस्ट्री, Video व्हायरल

नेमकं काय झालं?

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तिसरा वनडे सामना बे ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. सामन्यात ३९ व्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचा तय्यब ताहिर फलंदाजी करत होता. त्या वेळेस न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जॅकब डफी गोलंदाजी करत होता. डफी गोलंदाजी करत असताना अचानक स्टेडियमची लाईट गेली आणि सगळीकडे अंधार झाला. रनअपच्या दरम्यान अचानक लाईट गेल्याने डफी मध्येच थांबला.

NZ VS PAK
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालच्या गोव्याकडून खेळण्याच्या निर्णयावर आकाश चोप्राचं मोठं वक्तव्य, 'त्याने पैशांसाठी...'

थोड्या वेळाने पुन्हा खेळ सुरु झाला. डफीने सेट झालेल्या तय्यब ताहिरला ३३ धावांवर बाद केले. न्यूझीलंडने पाकिस्तानच्या संघावर ४३ धावांनी मात केली आणि मालिकेमध्ये ३-० अशा आघाडीने मालिका देखील जिंकली. दरम्यान पाकिस्तानच्या पराभवासह सामन्यादरम्यानच्या घडलेल्या चित्रविचित्र घटनांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

NZ VS PAK
Bumrah Boult Video : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढली! दोन मित्रांचे रियुनियन; आता खरी मजा येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com